शिक्षण महर्षी कर्मवीरांवर चित्रपट
‘कर्मवीरायण’ चित्रपट 17 मे ला महाराष्ट्रभरात प्रदर्शित
मुंबई
शिक्षणाचं महत्व पटवून देणारे, खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणारे, शिक्षणाची गंगा गावोगावी पोहचवणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपट आता मोठ्या पडद्यावर येत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर सिनेमा येतो आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम भाऊराव पाटलांनी केलं. ‘कर्मवीरायण’ हा सिनेमा येत्या 17 मेला हा सिनेमा महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. कर्मवीर अण्णांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग आणि घटना यांचा समावेश या चित्रपटात करण्यात आला आहे.अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीर अण्णांची भूमिका साकारली आहे.सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, उषा नाईक हे कलाकार या सिनेमात आहेत. योगेश कोळी यांनी छायाचित्रण, संतोष गोठोस्कर यांनी संकलक म्हणून काम पाहिलं आहे.
ट्रान्सएफएक्स स्टुडिओज प्रा. लि. यांनी ‘कर्मवीरायण’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर 7 वंडर्स चे पुष्कर मनोहर हे या सिनेमाची प्रस्तुती करत आहेत. धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.अनेक महोत्सवांमध्ये या चित्रपटाचा गौरव केला गेला आहे. आता हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
