अरिजीत सिंगच्या गाण्यांच्या आज कार्यक्रम
“अष्टगंधार” मालिकेमधील चौथा भाग
सातारा:
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अष्टगंधार” आठ गायकांची खास मालिका मधील भाग चौथा हा दि. ३ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत गुरुवार बाग समाज मंदिर (बागेच्या मागे)मधे आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सध्याचा आघाडीचे पार्श्र्वगायक अरिजीत सिंग यांच्या गाण्यांवर आधारित आहे. तसेच रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे प्रसाद मुंद्रावळे कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम नानल, डॉ. सौ. कामिनी पाटील, विजय देशमुख, मुकुंद फडके दीपलक्ष्मीचे चेअरमन शिरीष चिटणीस हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे श्री. प्रमोद लोंढे यांची आहे व निवेदन सौ राधिका काळे यांचे आहे. प्रसाद मुंद्रावळे यांचे सोबत रॉयलचे इतर गायक त्यांना साथ सांगत देणार आहेत.
तरी या कार्यक्रमास सर्व रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गायक कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन दीपलक्ष्मीचे चेअरमन शिरीष चिटणीस व रॉयल म्युझिकल इव्हेंट्सग्रुप तर्फे करण्यात येत आहे.

