समता व बंधुत्वाची शिकवण आजच्या काळाची खरी गरज – डॉ. योगेश गुरव


गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची जयंती उत्साहात साजरी
सातारा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येक घटकांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाची कास धरून वाटचाल करणे आवश्यक आहे असे मत गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव यांनी व्यक्त केले ते लिंब ता. जि. सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी डॉ संतोष बेल्हेकर, डॉ. धैर्यशील घाडगे, डॉ. भूषण पवार, प्रबंधक निलेश पाटील अदि प्रमुख उपस्थित होते. डॉ. योगेश गुरव पुढे म्हणाले की लोकशाहीच्या रक्षणासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अखंडपणे कार्य केले दिनदुबळ्या व वंचित घटकांच्या प्रगतीसाठी झटताना अन्याय व अत्याचार प्रवृत्तीशी अखंड लढा देऊन या घटकाना न्याय मिळवून दिला .शिका आणि संघटित व्हा हा गुरुमंत्र देऊन समाज बांधवांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
प्रारंभी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपप्राचार्य डॉ योगेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग प्रमुख रोहन खुटाळे व प्रा. स्वप्नाली झोरे ,ग्रंथालय विभागाचे विजय निकम व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार विद्यार्थिनी दिव्या वेळेकर हिने केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!