बॉलिवूडचे तीन खान एकत्र झळकणार
अभिनेता आमिर खाननं दिले संकेत
मुंबई :
शाहरुख, सलमान आणि आमिर खान हे तिन्ही सुपरस्टार वर्षानुवर्ष बॉलिवूडवर राज्य करत आहे. सगळेच स्टार या तिघांसोबत काम करण्यासाठी नेहमीच आतुर असतात. या तिन्ही खान अभिनेत्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.आता हे तिन्ही खान लवकरच एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मध्यंतरी शाहरुख आणि सलमान खान पठाण आणि टायगर’ या दोन्ही सिनेमात काही काळासाठी का होईना पण एकत्र झळकले होते. त्यांच्या केमिस्ट्रीने स्क्रीनवर आग लावली होती. या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला होता. सलमान आणि शाहरुखने आधी देखील अनेक सिनेमात एकत्र काम केलं आहे. पण आमिर खान या दोघांसोबत कधीच दिसला नाही.
आमिर खान नुकतंच कॉमेडी शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये अभिनेत्यानं अनेक खुलासे केले आहेत.त्यानं या मंचावर वैयक्तिक आयुष्यासोबतच आगामी चित्रपटांविषयी देखील माहिती दिली. त्यानं या मंचावर आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सलमान आणि शाहरुख खानसोबत आमिर हे त्रिकुट ऑनस्क्रीनसोबतच ऑफस्क्रीन केमिस्ट्री देखील खूप आवडते. आता आमिर खानने या तिघांना कधी पाहता येईल हे सांगितलं आहे.आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान तिन्ही खान जिवलग मित्र देखील आहेत. तिघांना एकत्र पाहणं चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते. आमिर खानने यावेळी ‘तो सलमान आणि शाहरुखसोबत चित्रपटात काम करण्यास तयार आहेत.’ असा खुलासा केला आहे.
याविषयी बोलताना आमिर खान म्हणाला, ‘अलीकडेच मी सलमान आणि शाहरुखलाही भेटलो. आम्ही तिघेही एकत्र होतो. मी म्हणालो की, आपण तिघेही इतकी वर्षे एकाच इंडस्ट्रीत आहोत. पण इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये आम्ही एकत्र एकही चित्रपट केला नाही. ही आपली मोठी चूक असेल.’
आमिर खान पुढे म्हणाला, ‘तिघांनी मिळून एक चित्रपट करण्याचं मान्य केलं आहे, आता आम्हाला फक्त एक चांगली स्क्रिप्ट आणि दिग्दर्शकाची प्रतीक्षा आहे. मला आशा आहे की आता चांगले दिग्दर्शक आम्हाला चांगला सिनेमा ऑफर करतील.”
