तरुण करणार रोबोटसोबत लग्न


रोबोट तयार करण्यासाठी १९ लाख रुपये खर्च

जयपूर :
राजस्थानमधील एक व्यक्ती चक्क रोबोटसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची अजब गजब माहिती उघडकीस आली आहे. राजस्थानमध्ये जयपूर येथील इंजिनियर सूर्य प्रकाश समोटा एका रोबोटशी लग्न करणार आहे. रोबोट्सची आवड असलेल्या सूर्य प्रकाश आता रोबोटच्या प्रेमात पडले असून, ते आता ‘गीगा’ या नावाच्या रोबोटसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.
सूर्य प्रकाश यांचे मन रोबोटमध्ये गुंतलं होतं. कुटुंबाने त्याची रोबोट्सची आवड पाहून आयटी क्षेत्रात जाण्याची परवानगी दिली. यानंतर सूर्य प्रकाश यांनी अजमेरच्या शासकीय महाविद्यालयातून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते रोबोटिक्समध्ये रुजू झाले. या काळात त्यांनी अनेक प्रकल्पांवर काम केलं. तर आता ते एका रोबोटसोबत सर्व विधी, परंपरेनुसार लग्न करणार आहे. तसेच कुटुंबातील सदस्यही त्यात सहभागी होणार आहेत, असे सूर्य प्रकाश यांनी सांगितले.
‘गीगा’ हा रोबोट तयार करण्यासाठी सुमारे १९ लाख रुपये खर्च आला. अशा प्रकारचं लग्न करण्यास कुटुंबियांचा नकार होता. पण, आता त्यांना मी तयार केलं आहे. या रोबोटची निर्मिती तामिळनाडूमध्ये केली जात आहे, तर त्याचे प्रोग्रामिंग दिल्लीत केले जात आहे.

Advertisement

सूर्य प्रकाश यांनी सांगितलं की, “जेव्हा हा सर्व प्रकार मी आपल्या पालकांना सांगितला तेव्हा त्यांना धक्काच बसला, पण नंतर घरच्यांना समजावलं. ‘गीगा’च्या संपूर्ण प्रोग्रामिंगसाठी सुमारे ५ लाख रुपये खर्च येणार असून, हा प्रोग्रामिंग इंग्रजीमध्ये असणार आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा हिंदी प्रोग्रामिंग देखील जोडलं जाऊ शकतं. तसेच, ‘गीगा’ आठ तास काम करू शकते, ज्यामध्ये पाणी आणणे, हॅलो म्हणणे, पाहुण्यांचे स्वागत करणे यासारखी कामं तो रोबोट करणार आहे.”

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!