जावयाने केले सासूशी लग्न


अनोखी प्रेमकहाणी,सासऱ्यानेच लावलं दोघांचं लग्न

Advertisement

पाटणा :
प्रेमात माणूस सगळ्या मर्यादा ओलांडतो, असं म्हणतात. हे प्रेम कधी, कसं, कोणावर होईल हे कोणीही सांगू शकत नाही.आता समोर आलेली एक प्रेमकहाणी अतिशय अनोखी आहे. ही प्रेमकहाणी आहे सासू आणि जावयाची.बिहारमधून ही घटना समोर आली असून सध्या चांगलीच चर्चेतही आहे. ही कहाणी आहे, एका अनोख्या विवाहाची. यात एका व्यक्तीच्या सासऱ्याने स्वतःच्या बायकोचं लग्न जावयाशी लावलं. मग पत्नीची पाठवणीही केली. या लग्नाबद्दल ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. हे संपूर्ण प्रकरण बांका जिल्ह्यातील आहे.
टाउन पोलीस स्टेशन हद्दीतील छत्रपाल पंचायतीत एका जावयाचं आपल्याच सासूवर प्रेम जडलं. हे पाहून सासऱ्याने आपल्या पत्नीचं लग्न आपल्या जावयासोबत लावून दिलं. आपल्या पत्नीचं जावयासोबत लावल्यानंतर सासऱ्याने दोघांना न्यायालयात आणलं. जिथे त्यांचं कोर्ट मॅरेज करून पत्नीला जावयासोबत पाठवून निरोप दिला. मिळालेल्या माहितीनुसार, कटोरिया पोलीस स्टेशन हद्दीतील धोबनी गावातील एका तरुणाचं बांका पोलीस स्टेशन हद्दीतील छत्रपाल पंचायतमधील एका मुलीशी लग्न झालं होतं. या जोडप्याला एक मुलगा आणि मुलगीही आहे. मात्र, काही वर्षातच त्याच्या पत्नीचं निधन झालंकाही दिवसांपूर्वी पत्नीच्या निधनानंतर त्याचा सासूवर जीव जडला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. नुकताच हा तरुण सासरच्या घरी आला होता. तेव्हा सासऱ्याला याबद्दल समजलं. याची माहिती मिळताच त्यांनी सासऱ्याने ग्रामस्थांना माहिती दिली. यावेळी सासू आणि जावयाने एकमेकांवर प्रेम असल्याचं मान्य केलं. मग पतीने आपल्या पत्नीचा विवाह जावयासोबत केला आणि दोघांना निरोप दिला. हा विवाह संपूर्ण गावात चर्चेचा विषय ठरला आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!