करोडपती व्हायचंय ?


अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’चा सीझन 16 लवकरच

Advertisement

मुंबई
सोनी टीव्हीचा लोकप्रिय क्विझ रिॲलिटी शो, कौन बनेगा करोडपती त्याच्या 16व्या सीझनसह टीव्हीवर परतणार आहे. अलीकडेच, सोनी टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या शोचा प्रोमो पोस्ट करून नोंदणीची घोषणा करण्यात आली आहे.
या व्हिडिओनुसार, नोंदणी 26 एप्रिल 2024 रोजी रात्री 9 वाजता सुरू होणार आहे. केबीसीच्या नोंदणीच्या घोषणेनंतर आता अमिताभ बच्चन यांचे चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. कौन बनेगा करोडपतीच्या 16 व्या सीझनसाठी अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. कारण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांचा हा शो ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजेच 5 ऑगस्ट 2024 पासून सुरू होऊ शकतो. मात्र या संदर्भात वाहिनी किंवा अमिताभ बच्चन यांच्याकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, शोमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांची निवड निर्मात्यांद्वारे केली जाईल आणि 75 टक्के स्पर्धकांसह शोचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतरच हा शो ऑन एअर होईल


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!