रविवार विचारयात्रा


1. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते तर माणुसकीने माणसाला जिंकता येते.

2. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही.

3. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं.

4. चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो.

5. आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्वाचे असते.

Advertisement

6. जीवनात कितीही वाईट प्रसंग येउद्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका, विजय हा नेहमी सत्याचाच होतो.

7. एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळते.

8. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.

9. दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्याचामाणूस करता येईल.

10. ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि सय्यम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!