रविवार पॉझिटिव्ह


झाडे झुडपे सुद्धा एकमेकांशी बोलत असतात
तेल अबीव विद्यापीठातील संशोधकांचे संशोधन
तेल अबीव
 वनस्पतींना सुद्धा जीव असतो आणि भावना असतात अशा प्रकारचे संशोधन कित्येक वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी केले होते याच संशोधनाचा पुढील भाग समोर आला असून वनस्पती आणि झाडे झुडपे एकमेकांशी बोलून संवाद साधत असतात अशा प्रकारचा दावा तेल अविब विद्यापीठातील काही संशोधकांनी केला आहे वनस्पती आणि झाडे झुडपे जेव्हा एकमेकांशी बोलत असतात तेव्हा त्या संवादाची फ्रिक्वेन्सी एवढी जास्त असते की मानवी कानाला त्यांचा तो संवाद ऐकू येत नाही असे या संशोधकांचे म्हणणे आहे सेल नावाच्या एका सायंटिफिक जर्नलमध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले असून वनस्पती आपल्या आयुष्यामध्ये किती विविध प्रकारचे आवाज काढत असतात आणि संवाद साधत असतात याची माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे लिल्याच हेडानी या संशोधकाच्या नेतृत्वाखाली हे महत्त्वपूर्ण संशोधन करण्यात आले असून यावर आगामी काळात आणखी अभ्यास करण्यात येणार आहे वनस्पती आणि झाडेझुडपांच्या आयुष्यामध्ये सुद्धा जेव्हा तणावाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा ते अल्ट्रासॉनिक साऊंड प्रसारित करतात असे या संशोधनात म्हटले आहे या संशोधकांनी काही वनस्पतींनी काढलेले आवाज ध्वनीमुद्रित करण्यातही यश मिळवले आहे या संशोधनात टोमॅटो आणि तंबाखूच्या वनस्पतींनी काढलेले आवाज आणि संवाद ध्वनिमुद्रित केले आहेत या संशोधकांनी जे आवाज ध्वनीमुद्रित केले आहेत ते एखाद्या पॉपकॉर्नप्रमाणे आहेत म्हणजे एखाद्या धान्यापासून जेव्हा लाही तयार होते तेव्हा जसा आवाज येतो त्या प्रकारचा आवाज या संशोधकांनी ध्वनीमुद्रित केला आहे वनस्पती आणि झाडेझुडपे जरी अशा प्रकारचे संवाद साधत असतील किंवा विविध प्रकारच्या आवाज काढत असले तरी मानवी कानाला मात्र ते आवाज ऐकू येत नाहीत वनस्पतींनी काढलेले हे आवाज उंदीर,वटवाघळ  आणि काही कीटक अशा काही प्राण्यांना मात्र निश्चितपणे ऐकू येतात असा या संशोधकांचा दावा आहे या बाबतचा प्रयोग करीत असताना संशोधकांनी काही वनस्पती अतिशय शांत आणि कोणताही आवाज नसलेल्या एका खोक्यामध्ये ठेवली आणि त्याच्या आसपास अल्ट्रासोनिक मायक्रोफोन आणि रेकॉर्डर ठेवण्यात आले या मायक्रोफोनची फ्रिक्वेन्सी 20 ते 250 किलोहर्ट्झ ठेवण्यात आली होती जेव्हा या मायक्रोफोन्सने काही आवाज ध्वनीमुद्रित केले तेव्हा एक विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या मशीनवर हे आवाज ऐकण्यात आले तेव्हा वनस्पती आणि झाडेझुडपे सुद्धा तणावाच्या परिस्थितीमध्ये आवाज काढतात किंवा एकमेकांशी संवाद साधतात ही गोष्ट संशोधकांच्या लक्षात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!