11 जिल्ह्यातून महाविकास आघाडी गायब


महायुतीला पैकीच्या पैकी जागा
मुंबई
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला.11 जिल्ह्यातून महाविकास आघाडी गायब झाली असून महायुतीला पैकीच्या पैकी जागा मिळाल्या आहेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात दणदणीत विजय मिळवला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून केवळ 49 जागांवर विजय मिळवला आहे, तर दुसरीकडे महायुतीने 230 पेक्षा जास्त जागा खेचून आणल्या आहेत.

महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेले जिल्हे

1. धुळे – 5 पैकी 5 जागा महायुतीने जिंकल्या
2. जळगाव – 11 पैकी 11 – जागा महायुतीने जिंकल्या
3. वर्धा – 4 पैकी 4 जागा महायुतीने जिंकल्या
4. गोंदिया 4 पैकी 4 जागा महायुतीने जिंकल्या
5. नांदेड 9 पैकी 9 जागा महायुतीने जिंकल्या
6. हिंगोली 3 पैकी 3 जागा महायुतीने जिंकल्या
7. जालना 5 पैकी 5 जागा महायुतीने जिंकल्या
8. छत्रपती संभाजीनगर 9 पैकी 9 जागा महायुतीने जिंकल्या
9. सातारा – 8 पैकी 8 जागा महायुतीने जिंकल्या
10. सिंधुदुर्ग 3 पैकी 3 जागा महायुतीने जिंकल्या
11. कोल्हापूर 10 पैकी 10 जागा महायुतीने जिंकल्या

Advertisement

महायुतीतील कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या?

भाजपने 132 जागांवर विजय मिळवला
शिवसेनने (शिंदे गट)- 57 जागांवर विजय मिळवला
राष्ट्रवादीने (अजित पवार गट)- 41 जागांवर विजय मिळवला

महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाने किती जागांवर विजय मिळवला?
काँग्रेसने 103 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी केवळ 16 जागांवर विजय मिळवलाय.
राष्ट्रवादीने (शरद पवार गट) 87 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ 10 जागांवर विजय मिळवता आला
शिवसेनेने (ठाकरे गट)- 95 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ 20 जागांवर विजय मिळवता आला

20 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार
धुळे, जालना, छ. संभाजीनगर, बीड, हिंगोली, धाराशिव, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग , नाशिक, जळगाव या जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष हद्दपार झाला आहे

कोण कोणते नेते पराभूत ?
पृथ्वीराज चव्हाण
बाळासाहेब थोरात
धीरज विलासराव देशमुख
ऋतुराज पाटील
यशोमती ठाकूर

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!