महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान
23 नोव्हेंबरला मतमोजणी
नवी दिल्ली
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23तारखेला मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे.
महाराष्ट्रातल्या एकूण मतदारांच्या आकडेवारीचा विचार केला तर महाराष्ट्रात 9.63 कोटी मतदार आहेत, त्यापैकी 4.97 कोटी पुरुष मतदार आहेत. तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत.
महाराष्ट्रात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र आहेत. यात शहरांमध्ये 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 मतदान केंद्र आहेत. यावेळी निवडणूक आयोगाकडून 530 मॉडेल मतदान केंद्र बनवणार असल्याची माहिती आहे.
विधानसभेतील इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 29 ऑक्टोबर 2024 (मंगळवार) ही असणार आहे. यासाठीची अर्ज पडताळणी30 ऑक्टोबर 2024 (बुधवार) रोजी होणार आहे.

ज्या उमेदवारांना निवडणुकीतून माघार घ्यायची आहे त्यांच्यासाठीची मुदत ही 4 नोव्हेंबर 2024(सोमवार)ची असणार आहे. तर या सगळ्या प्रक्रियेनंतर आणि प्रचारानंतर महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर 2024 मतमोजणी होऊन महाराष्ट्रातील मतदारांचा कौल स्पष्ट होणार आहे.
1 तासापूर्वीशहरी मतदानाचा टक्का वाढावा म्हणून आम्ही मुद्दाम बुधवारी मतदान ठेवलं आहे
शहरी मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं चित्र अलीकडच्या निवडणुकांमध्ये दिसून येत असल्याचं राजीव कुमार म्हणाले. याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, “शहरी मतदारांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही मुद्दाम बुधवार हा दिवस मतदानासाठी निवडला आहे. कारण याआधी बऱ्याचदा याबाबत अनेकांनी आक्षेप घेतला होता.”
राजीव कुमार म्हणाले की, “देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये झालेल्या मतदानाची आकडेवारी बघितली तर असं लक्षात येईल की, शहरी मतदारांनी राज्यातील मतदानाच्या एकूण सरासरीपेक्षा खूपच कमी मतदान केलं आहे. यामध्ये गुडगाव, हरियाणा, मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या शहरांचा समावेश होतो.
शहरी मतदार
आम्ही एका आठवड्यात महापालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन शहरी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करत असल्याचं राजीव कुमार म्हणाले.
झारखंडमध्ये दोन फेऱ्यांमध्ये मतदान होणार आहे. 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर या राज्याचे निकाल महाराष्ट्रासोबतच 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहेत.
झारखंडचा विचार केला तर तिथे एकूण 24जिल्हे आहेत. तिथे एकूण 81जागा आहेत. त्यापैकी खुल्या वर्गासाठी 44 जागा आहेत, अनुसूचित जमातींसाठी 28 जागा राखीव आहेत तर उर्वरित जागा या अनुसूचित जातींच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
5 जानेवारी 2025 रोजी झारखंडच्या विधानसभेची मुदत संपत आहे. झारखंडमध्ये एकूण 2 कोटी 60 लाख मतदार आहेत. ज्यामध्ये 1.29 कोटी महिला मतदार तर 1 कोटी 30 लाख पुरुष मतदार आहेत.

