भारत महान होता आणि महानच राहील
साहित्यिक गप्पा कार्यक्रमात दीपक करंजीकर यांचे प्रतिपादन
सातारा
भारताला हजारो वर्षाचा दैदिप्यमान इतिहास आहे. इतर देशांच्या तथाकथीत विकासाची तुलना भारताबरोबर केली जात असली तरी भारताचे महानपण वेगळे आहे. भारत पूर्वीही महान होता आताही महान आहे या पुढेही महानच राहील असे प्रतिपादन जेष्ठ अभिनेते लेखक आणि अर्थतज्ञ दीपक करंजीकर यांनी केले येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सातारा व दीपलक्ष्मी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार व मानपत्र वितरण आणि साहित्यिक गप्पा कार्यक्रमावेळी दीपक करंजीकर बोलत होते
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेत्री भाग्यश्री देसाई,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी,आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री,दीपलक्ष्मी पतसंस्थेचे शिरीष चिटणीस आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे समनव्यक श्रीराम नानल दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले उपस्थित होते
यावेळी विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते दीपक करंजकर यांचा शाल आणि सातारी कंदी पेढे देऊन सत्कार करण्यात येऊन त्यांना सातारकर नागरिकांतर्फे मानपत्र बहाल करण्यात आले तर शिरीष चिटणीस यांच्या हस्ते अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांचा शाल आणि सातारी कंदी पेढे देऊन सत्कार करण्यात येऊन त्यांनाही मानपत्र बहाल करण्यात आले
त्यानंतर डॉक्टर संदीप स्रोत्री यांनी दीपक करंजीकर यांच्याशी आणि श्रीराम नानल यांनी भाग्यश्री देसाई यांच्याशी संवाद साधला
डॉ श्रोत्री यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दीपक करंजीकर यांनी भारताच्या दैदिप्यमान इतिहासाची मांडणी केली आणि इतर देशांच्या तुलनेमध्ये भारत कशाप्रकारे प्रगती करत आहे याची माहिती अधोरेखित केली
विविध क्षेत्रात लीलया या वरत असलेल्या दीपक करंजीकर यांनी आपल्याला अभिनय लेखन पर्यटन अर्थकारण या सर्वच गोष्टी आवडत असल्याचे सांगितले आणि अर्थकारणासारखा विषय वृक्ष रुक्ष नसून उलट तो सर्वात महत्त्वाचा विषय आहे असे प्रतिपादनही केले
श्रीराम नानल यांच्याशी संवाद साधताना भाग्यश्री देसाई यांनी आपल्या कारकीर्दीचा उलगडा केला देवल घराण्यात जन्माला आलेल्या भाग्यश्री देसाई यांनी आपला अभिनेत्री ते निर्माती हा प्रवास स्पष्ट केला घरातूनच चांगले संस्कार मिळाल्याने चांगले काम भविष्यात करता आले असे त्यांनी यावेळी सांगितले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले त्यांनी या कार्यक्रमामागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली दीपक करंजीकर व भाग्यश्री देसाई यांच्यासारख्या व्यक्तींचा सत्कार करण्याचे भाग्य सातारकरांना लाभत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला
यावेळी सातारच्या नाट्य क्षेत्रामध्ये अभिमानास्पद कामगिरी करणारे नाट्यकर्मी डॉक्टर निलेश माने अभिनेते संतोष पाटील अभिनेते रवी इनामदार अभिनेत्री स्नेहा घडवई आणि राजू मुळे यांचा दीपक करंजीकर आणि भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
विनोद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणामध्ये साहित्यविषयक आणि नाट्यविषयक घडामोडी साताऱ्याचे योगदान स्पष्ट केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी केले श्रीराम नानल यांनी लिहिलेल्या दीपक करंजीकर आणि भाग्यश्री देसाई यांच्या मानपत्राचे वाचनही मुकुंद फडके यांनीच केले
दीपक करंजीकर आणि भाग्यश्री देसाई यांचा यांच्या प्रमुख भूमिका असलेले तू भेटशी नव्याने हे नाटक सध्या गाजत असून त्याचा प्रयोग साताऱ्यात आयोजित केला होता त्यानिमित्ताने हे दोघे साताऱ्यात आल्याचे औचित्य साधून त्यांचा हा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला सातारकरांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली
फोटो ओळ
दीपक करंजीकर यांचा सत्कार करताना विनोद कुलकर्णी,शेजारी विनायक भोसले डॉ संदीप श्रोत्री,भाग्यश्री देसाई शिरीष चिटणीस,श्रीराम नानल,मुकुंद फडके

