रविवार हास्यजत्रा


रविवार हास्यजत्रा

 

साधेपणा
बायको – मी किती साधी होते नाही.

लग्नाच्या वेळी तुम्हाला न बघतात होकार दिला होता.

नवरा – म्हणजे, तू माझा फोटो सुद्धा बघितला नव्हता का?

बायको – नाही ओ. आई-बाबांनी सांगितलं आणि मी तयार झाले.

नवरा – मी तर तुझ्यापेक्षाही साधा होतो.

तुझा फोटो पाहूनही मी नकार दिला नाही

 

…………………………………………….

 

दारू

बंड्या – (पिंट्याला) दारू ही जगातील सगळ्यात वाईट गोष्‍ट आहे.

बंड्याचं हे बोलणं ऐकून पिंट्याला बरं वाटलं.

त्याला वाटलं बंड्याला आपली चूक कळली, तो बहुतेक आता दारू बंद करणार.

Advertisement

पिंट्या – बरं झालं बंड्या. शेवटी तुला कळलं. आता लगेच दारू सोडून टाक.

बंड्या – छे छे… सोडून का?

पिंट्या – अरे तूच म्हटलास ना वाईट आहे म्हणून.

बंड्या – हो पण ती सोडायची म्हणून नाही म्हणालो.

अरे, काल रात्री दारूच्या नशेत मी ‘आय लव्ह यू’ म्हणालो, तेही बायकोला

…………………………………………..

All Out

मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने
मच्छर खाल्ले,
बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस
डॉक्टरला बोलाव,
मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण
नाही बाईसाहेब..
मी त्याला All Out पाजले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!