रविवार स्पेशल ब्रेकफास्ट
मटर चाट
सकाळी अथवा संध्याकाळी नाश्त्यासाठी मटर चाटसारखा दुसरा चांगला पर्याय नाही.पटापट तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता. हे चाट सगळयांनाच आवडतं.
साहित्य –
वाटाणे (रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, बटाटे उकडवून घ्या, कापलेला बारीक कांदा, कोथिंबीर,चवीनुसार मीठ,जीरे पावडर,धने पावडर,तिखट,लिंबू
कृती
रात्रभर पाण्यात वाटाणे भिजवून ठेवा. नंतर बटाटे आणि वाटाणे वेगवेगळ्या भांड्यात ठेवून कुकरमध्ये शिजवून घ्या. बाहेर काढल्यावर व्यवस्थित बटाटे कुस्करून घ्या. वाटाणे शिजवताना त्यात पाणी, हिंग आणि थोडंसं मीठ घालायला विसरू नका त्यानंतर वाटाणे आणि बटाटे मिक्स करा.त्यात बारीक चिरलेला कांदा, मीठ, कोथिंबीर, तिखट, लिंबाचा रस, धने आणि जिरे पावडर अथवा चाट मसाला घाला. हवं असल्यास, पापडाचा चुरा आणि गोड अथवा तिखट चटणीदेखील तुम्ही मिक्स करू शकता.
