उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत


‘त्या’ दाव्याला देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार प्रत्युत्तर

मुंबई
2019 ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीला जाईल, असा शब्द देवेंद फडणवीस यांनी मला दिला होता, असं दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.त्याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आमचे जुने मित्र उद्धव ठाकरे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांच्या बोलण्यातील तफावत आता लोकांसमोर आली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. ते अमरावतीत बोलत होते.
आज ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की मी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करेल आणि मी दिल्लीला जाईल. त्यांना वेड लागलं असेल मला तर नाही ना… माझा सवाल आहे, कालपर्यंत यांना भ्रम होत होता. अमित शाहांनी त्यांना कोणत्या तरी खोलीत नेऊन तुम्हाला मुख्यमंत्री करतो असं सांगितलं. हा त्यांचा कालपर्यंतचा भ्रम होता. आता त्यांचा भ्रम बदलला. आता म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Advertisement

उद्धवजी आधी हे ठरवा अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रनी सांगितलं. अमित भाईंनी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो की देवेंद्रनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो.खुर्ची गेल्याने त्यांना काहीच सूचत नाही. त्यामुळे एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोललं जात आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या दाव्यावर भाष्य केलंय.

होय मी त्यांना सांगितलं होतं, आदित्य ठाकरेंना लढवा… कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायाचं आहे. काहीतरी ट्रेनिंग तरी त्याला मिळालं पाहिजे. पण आदित्यला मुख्यमंत्री तर सोडाच पण मंत्री बनवण्याचाही विचार नव्हत त्यांच्या पक्षाने त्यांना मंत्री बनवलं नसतं. तर पक्षाची अशी हालत झाली नसती. पण यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की एक तर मी मुख्यमंत्री नाही तर माझा मुलगा मुख्यमंत्री. म्हणूच ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!