लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती हा महत्त्वाचा ठेवा


शारदीय व्याख्यानमालेत डॉक्टर भावार्थ देखणे यांचे प्रतिपादन

Advertisement

सातारा
लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती हा महत्त्वाचा ठेवा आहेअसे प्रतिपादन शारदीय व्याख्यानमालेत बोलताना डॉक्टर भावार्थ देखणे यांनी केले
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा मार्फत ल ना वाडीकर स्मृत्यर्थ शारदीय व्याख्यानमालेच्या शुभारंभाला डॉक्टर भावार्थ देखणे यांचे लोकसाहित्य व प्रबोधन या विषयावर व्याख्यान संपन्न झाले .यावेळी बोलताना त्यांनी लोकसाहित्यातील जात्यावरील ओवी , भारुड , वासुदेव , पोवाडा , गवळण , जोगवा या साहित्य प्रकारांवर भाष्य केले
दिवसेंदिवस हे काळानुरूप अदृश्य होऊ लागलेले विश्व त्यांनी त्यांच्या भाषणातून पुन्हा उभे केले .संत साहित्य आणि लोकसाहित्य हे एकमेकांशी कसे संलग्न आहे हे समजावून सांगितले .लोक साहित्य हे माणसाच्या मनाला सजग करणारे असून वेगवेगळ्या पद्धतीने ते माणसाचे प्रबोधन करणारे आहे त्यामुळे त्याचे ज्ञान पुढच्या पिढीला पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे
यावेळी नगर वाचनालयाचे अध्यक्ष अनंतराव जोशी उपाध्यक्ष अतुल दोशी साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने कार्यवाह वैदेही कुलकर्णी त्याचबरोबर वाचनालयाचे संचालक डॉक्टर रवींद्र भारती झूटिंग प्रदीप कांबळे पद्माकर पाठकजी श्रीधर साळुंखे उपस्थित होते श्रोत्यामध्ये चंद्रकांत कांबिरे , डॉक्टर आदिती काळमेख , सागर गायकवाड उपस्थित होते .
डॉक्टर राजेंद्र माने यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून दिली .
प्रदीप कांबळे यांनी आभार मानले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही कुलकर्णी यांनी केले .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!