कोणत्या देवाला साकडे घालणार ?


आपल्या राशीनुसार साकडे घातले तर लाभ

सातारा
एखादे कामी होण्यासाठी देवाला साकडे घालणे हा मनुष्य स्वभाव आहे पण राशीनुसार कोणत्या देवाला साकडे घेतले तर ते फलदायी ठरते याबाबतही काही नियम आहेत आपल्या जन्मावेळी चंद्र ज्या राशीत असतो किंवा प्रवेश करतो. ती आपली रास असते.सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतातच, परंतु आपल्या पाठीशी कोणत्या देवतांचा आशीर्वाद सर्वाधिक असतो हेसुद्धा आपल्या राशीवरून ठरतं.
राशीनुसार देवी-देवतांची पूजा केल्यास आपल्याला कधीच कसलीच कमतरता भासत नाही.कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या देवतेची पूजा करणं प्रचंड लाभदायी असते ते पाहूया

मेष आणि वृश्चिक:
या राशींचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मारुतीराया हे मंगळ ग्रहाचे स्वामी मानले जातात. तर, मारुतीरायांचे सर्वात आवडते दैवत श्रीराम आहेत असं म्हणतात. म्हणून या राशीच्या लोकांनी हनुमान आणि श्रीरामांची पूजा करणं लाभदायी ठरेल.

मिथुन आणि कन्या:
या राशींचा स्वामी ग्रह बुध आहे. बुध ग्रहाचे स्वामी आहेत गणपती बाप्पा आणि भगवान विष्णू. त्यामुळे या राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाची आणि विष्णूंची पूजा करणं लाभदायी ठरेल.

Advertisement

तूळ आणि वृषभ:
या राशींचा स्वामी ग्रह आहे शुक्र. दुर्गा देवी ही शुक्र ग्रहाची आराध्यदैवत मानली जाते. त्यामुळे या राशीच्या लोकांनी दुर्गा देवीची मनोभावे पूजा करावी.

धनू आणि मीन:
या राशींचा स्वामी गुरू ग्रह आणि गुरू ग्रहाचे स्वामी भगवान विष्णू आहेत. तर, विष्णूंचं सर्वाधिक आवडतं दैवत आहे देवी लक्ष्मी. त्यामुळे या राशीच्या लोकांनी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची मनोभावे पूजा करावी.

मकर आणि कुंभ:
शनी हा या राशींचा स्वामी ग्रह मानला जातो. शनीचे स्वामी आहेत मारुतीराया आणि महादेव. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मारुतीराया आणि महादेवांची पूजा करणं फायदेशीर ठरेल.

सिंह :
या राशींचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्याचे स्वामी मारुतीराया आणि गायत्री माता मानल्या जातात. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मारुतीराया आणि गायत्री मातेची मनोभावे पूजा करावी.

कर्क :
या राशींचा स्वामी ग्रह आहे चंद्र. चंद्राचे स्वामी आहेत महादेव. त्यामुळे या राशीच्या लोकांनी महादेवांची मनोभावे पूजा करणं फायदेशीर ठरेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!