वार्षिक राशिभविष्य २०२४ मकर रास
वार्षिक राशिभविष्य २०२४
मकर रास

प्रत्येक कार्यात चांगले यश मिळेल
न्यूजमंडीच्या वाचकांना नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
मकर राशीचे लोक खूप जास्त महत्त्वाकांक्षी असतात. ते खूप मेहनत घेत असल्यामुळे त्यांना लवकर यश मिळते. हे लोक खोल विचारसरणीचे असतात आणि चांगले स्पष्टवक्ते असतात.हे लोक खूप चांगले मित्र असतात आणि नेहमी मित्राच्या मदतीला धावून जातात. ते स्वभावाने खूप भावनिक असतात. त्यामुळे अनेकदा त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होतो.मकर राशीच्या व्यक्ती रागीट असतात. अनेकदा रागाच्या भरात ते स्वत:चे नुकसान करून घेतात. नंतर त्यांना त्याबाबत पश्चातापही होतो. ते इतरांशी खूप प्रेमळ व आपुलकीने वागतात. त्यामुळे अनेकांना त्यांचा स्वभाव आवडतो.हे लोक कुटुंबाला अधिक महत्त्व देतात. ते नेहमी प्रामाणिक लोकांच्या शोधात असतात. त्यामुळे त्यांना प्रामाणिक जोडीदार मिळतो. प्रेम, काळजी, विश्वास व समजूतदारपणा या गुणांमुळे ते अनेकांना प्रिय असतात.
वर्षाच्या सुरुवातीला शनि मंगळ कुयोगामुळे घरातील व्यक्तींच्या आजारावर खर्च करावा लागेल यावर्षी काहींना वास्तू योग संभवतात काहींना नोकरीत पदोन्नती संभवते ग्रहणाजवळ नोकरी व्यवसायिकांना चांगल्या आनंददायक वार्ता मिळू शकतात पंचमातून होणारे गुरु भ्रमण अनेक प्रकारे लाभदायक असले तरी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू असल्याने हे वर्ष संमिश्र प्रकारचे जाईलएप्रिल 2024 पर्यंत गुरु तुमच्या चतुर्थस्थानातून भ्रमण करील तर तुमचा राशी स्वामी द्वितीय स्थानातून भ्रमण करेल जो तुम्हाला चांगले यश मिळवून देईलच परंतु तुमच्या संपूर्ण जीवनाचाही कायापालट करून देईल कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात राहू तृतीय स्थानात तर केतू नवमस्थानातून भ्रमण करेल ज्यामुळे प्रत्येक कार्यात चांगले यश मिळेल
मे 2024 नंतर गुरु पंचम स्थानातून भ्रमण करेल ज्यामुळे करिअरमध्ये स्थिरता आणि आर्थिक स्थिती मजबूत राहील नोकरीत पदोन्नती मिळू शकते कौटुंबिक जीवनात आनंद आणि सुख सुविधा मिळतील व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल आध्यात्मिक कार्यातही तुम्ही भाग घ्याल राहू आणि केतू चे परिवर्तन कुटुंब नातेसंबंध भाग्य आणि करिअर साठी सकारात्मक राहील शनीचे द्वितीय स्थानातून भ्रमण यामुळे काहींची नोकरीत बदली होऊ शकते काहींना करिअरमध्ये फारसे समाधान वाटणार नाही नोकरीत काम करताना अनेक अडचणी येऊ शकतात त्यामुळे करिअरशी संबंधित मोठा निर्णय यावर्षी घेऊ नये मे 2024 नंतर करियर मध्ये यश आणि स्थिरता मिळेल जे लोक परदेशात जाऊ इच्छितात त्यांना चांगल्या संधी मिळतील एप्रिल 2024 पर्यंत धनप्राप्तीचे योग फारसे अनुकूल नाहीत त्याचबरोबर कौटुंबिक खर्चही या काळात वाढतील कदाचित त्यासाठी तुम्हाला कर्जही घ्यावे लागेल परंतु मे 2024 नंतर गुरुचे भ्रमण पंचमस्थानातून होईल ज्यामुळे तुम्ही पैशाची बचत करू शकाल मे महिन्यात तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूकही करू शकता तुम्हाला त्यापासून लाभ मिळेल दुसऱ्या स्थानातील शनीमुळे तुम्ही पैसा कमविण्याचा आळस कराल त्यामुळेही तुमची पैसे कमवण्याची क्षमता कमी राहील
विद्यार्थ्यांना एप्रिल 2024 पूर्वी अभ्यासात चांगले यश मिळू शकणार नाही या काळात तुम्हाला अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे वर्ष अनुकूल राहील
एप्रिल 2024 पर्यंत चतुर्थातील गुरुमुळे कुटुंबात संपत्ती किंवा कायदेविषयक काही वाद विवाद होण्याची शक्यता आहे ज्याचा वाईट प्रभाव नातेसंबंधावर होईल शनि च्या द्वितीय स्थानातून होणाऱ्या भ्रमणामुळे ही कुटुंबातील लोकांमध्ये सामंजस्य कमी होईल सध्या तुम्हाला साडेसाती चालू आहे परंतु मे 2024 नंतर गुरुचे पंचमस्थानातील भ्रमण कुटुंबात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येईल कुटुंबासोबत एखादी चांगली यात्राही घडेल
प्रेम आणि विवाह साठी मे 2024 नंतरचा काळ अनुकूल राहील व्यक्तिगत जीवनातील कोणताही शुभ आणि मोठा निर्णय मे 2024 नंतर घेतला तर त्याचा फायदा होऊ शकेल
चतुर्थस्थानातील गुरूमुळे एप्रिल 2024 पर्यंत तुम्हाला कामाचा ताण राहणार आहे त्याचबरोबर द्वितीय स्थानातील शनीमुळे पाय गुडघे किंवा सांधेदुखी यासारख्या आरोग्याच्या तक्रारी जाणवतील तृतीयातील राहू आणि नवम स्थानातील केतूमुळे कामासाठी तुम्हाला अनेक प्रवास करावे लागतील ज्याचा तुमच्या आरोग्यावर तणाव वाढेल
