अपघातात 5 वऱ्हाडींचा जागीच मृत्यू


सांगलीत भीषण अपघात, अनेकजण जखमी
सांगली
एका लग्नावरून परतणाऱ्या वाहनाला सांगलीत अपघात झाला आहे.या घटनेत 5 वऱ्हाडींचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.सांगली जिल्ह्यातील नागज-जत रोडवर जांभूळवाडी येथे हा अपघात झाला. एका क्रुझर जीपमधू लग्नाचे वऱ्हाडी प्रवास करत होते. ही जीप विजयपूर-गुहागर महामार्गावर आली असता, जीपच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि या जीपने जत-मुंबई लक्झरी बसला धडक दिली. यात जीपमध्ये बसलेले 5 जण जागीच ठार झाले तर इतर लोक जखमी झाले आहेत.
हा अपघात इतका भीषण होता की, क्रुझर जीपच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यात चालकाचाही समावेश आहे. तर मागे बसलेले उर्वरित लोक गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या अपघाचाची माहिती मिळताच कवठेमहांकाळ आणि जत पोलीसांसह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीसांनी गंभीर जखमींना ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तर काहींना पुढील उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले. आताही काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
हा अपघात झाला त्यावेळी क्रुझर जीपमध्ये फराळाचे पदार्थही होते, हे पदार्थ अपघातानंतर रस्त्यावर विखरले होते. त्यामुळे धटनास्थळावरील दृश्य हे मनाला चटका लावणारे होते, आनंदाच्या दिवशीच 5 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!