वार्षिक राशिभविष्य तुळ रास


वार्षिक राशिभविष्य

तुळ रास

संमिश्र वर्ष,प्रयत्न करावे लागणार

न्यूज मंडीच्या वाचकांना नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Advertisement


तूळ ही राशिचक्रातील सातवी रास आहे. तूळ राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. ते समाजाच्या हितासाठी अनेक चांगल्या गोष्टी करत असतात. त्यांच्या दिलखुलास व हसऱ्या स्वभावाने ते अनेकांना प्रिय असतात.या राशीचे लोक इतर राशींच्या तुलनेत खूप जास्त संवेदनशील असतात. रिलेशनशिपमध्येही हे लोक खूप जास्त रोमँटिक असतात. या लोकांचे पार्टनर त्यांना खूप जास्त सहकार्य करतात.खोडकर स्वभाव असलेल्या या राशीच्या लोकांना प्रत्येक नात्यात पारदर्शकपणा आणि स्थिरता हवी असते. इतरांच्या भावना नेहमी समजून घेणाऱ्या या राशीच्या व्यक्तींना खूप चांगले मित्रसुद्धा असतात.या राशीच्या व्यक्तींना शिस्तप्रिय जीवन जगायला आवडते. चांगल्या-वाईट गोष्टींतील फरक यांना लवकर कळतो. त्यामुळे हे लोक नेहमी चांगल्या मार्गावर असतात आणि जीवनात यशस्वी होतात.
वर्षाच्या सुरुवातीला पंचमस्थानात होणारा शनी मंगळ युतीच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी सार्वजनिक नियमांचे उल्लंघन करू नये प्रेम प्रकरणातही काळजी घ्यावी लागेल या वर्षात तरुणांचे भाग्योदय होऊन नवीन नोकरीच्या संधी मिळतील काही तरुणांना विवाह योग येतील येणाऱ्या ग्रहणाजवळ आरोग्याची काळजी घ्या तसेच निराशा जनक विचार टाळा हे वर्ष तुमच्या राशीच्या लोकांसाठी संमिश्र प्रकारचे जाईल
एप्रिल 2024 पर्यंत गुरु तुमच्या सप्तम स्थानातून भ्रमण करेल तर भाग्यश्री तुमच्या पंचमस्थानातून भ्रमण करेल राहू षष्ठ स्थानात तर केतू बाराव्या स्थानात भ्रमण करेल एप्रिल 2024 पर्यंत चांगले धनलाभ आणि पैशांची बचत होईल शनि हा तुमचा कारक ग्रह असल्यामुळे धनलाभ तसेच अनेक सुख सुविधांचा तुम्हाला लाभ होईल जोडीदाराशी तसेच भागीदाराशीही संबंध चांगले राहतील मित्रांची मदत मिळेल 1 मे 2024 नंतर गुरुचे भ्रमण तुमच्या अष्टमस्थानातून होणार आहे त्यामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात आणि अचानक धनलाभ ही होऊ शकतात परंतु तरीही आर्थिक स्थितीसाठी ही परिस्थिती अनुकूल नाही या काळात तुम्ही अध्यात्मिक गोष्टींमध्ये जास्त रस घ्याल त्यामुळे अनेक अडचणी दूर होऊ शकतील 29 जून ते 15 नोव्हेंबर 2024 या काळात शनी वक्री होणार आहे त्यामुळे या काळात करियर सुख सुविधा आणि धनलाभ यामध्ये काही अडचणी येतील
पंचमातील शनी मुळे नवीन नोकरीची संधी मिळेल काहींना नोकरीत पदोन्नती ही मिळेल तुम्ही जर एखादा नवीन व्यापार सुरू करणार असाल तर तो एप्रिल 2024 पूर्वी सुरू करावा कारण त्यानंतर अष्टमात येणारा गुरु त्यासाठी अनुकूल नाही
यावर्षी आर्थिक स्थिती चांगली राहील नवीन गुंतवणुकी एप्रिल 2024 पूर्वी करू शकता मे 2024 नंतर तुमच्याकडे धन आगमन कमी प्रमाणात होईल अचानक वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते
विद्यार्थ्यांनाही एप्रिल 2024 पूर्वी दिलेल्या परीक्षांमध्ये चांगले यश मिळेल मात्र नंतर विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल
एप्रिल 2024 पर्यंत कौटुंबिक सौख्य उत्तम राहील घरात एखादे मंगल कार्य संपन्न होईल परंतु एक मे नंतर घरात काही वादविवाद होऊ शकतात
एप्रिल 2024 नंतर अष्टमातील गुरु आणि बारावा केतू यामुळे प्रेम आणि वैवाहिक जीवनात काही अडचणी निर्माण होऊ शकतात 12 जून ते 24 ऑगस्ट 2024 या काळात शुक्र अनुकूल राहील त्यामुळे प्रेम आणि विवाह या संबंधित विषयात सकारात्मक परिणाम मिळू शकतात
एप्रिल 2024 पर्यंत तुमचे आरोग्य चांगले राहील परंतु एक मे नंतर डोळ्याची आग होणे डोकेदुखी इत्यादी प्रकारची समस्या उद्भवू शकतात परंतु गुरूच्या दृष्टीमुळे या समस्यांचे लगेचच निराकरण होईल केतूच्या प्रतिकूल भ्रमणामुळे मानसिक ताणतणाव जास्त राहील त्यासाठी ध्यान आणि प्राणायाम यांची मदत घ्यावी

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!