बुधवारी हिंदी मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम
दीपलक्ष्मी पतसंस्था व गोल्डन इरातर्फे आयोजन
Advertisement
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व गोल्डन इरा म्युझिकल ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्या हिंदी मराठी मिक्स गाण्यांचा बहारदार कार्यक्रम मेरी आवाजही पहचान है बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे होणार आहे
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विष्णू गुजर, डॉक्टर कामिनी पाटील, प्राध्यापक ज्योती जगताप, मुकुंद फडके, शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत यावेळी गायक कलाकार प्रवीण जांभळे, अपर्णा गायकवाड आणि शामल काकडे विविध हिंदी मराठी गाणी सादर करणार आहेत
सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

