मायक्रोसॉफ्ट विंडोजची धुरा पवन दावुलुरी यांच्या हाती
भारतीय वंशाच्या आणखी एका तरुणाचा सन्मान
वॉशिंग्टन
पवन दावुलुरी हे मायक्रोसॉफ्टचे नवे प्रमुख होणार असून, त्यांच्याकडे मायक्रोसॉफ्टची जबाबदारी देण्यात आली आहे. आयआयटी मद्रासमधून शिक्षण घेतलेल्या पवन दावुलुरीला मायक्रोसॉफ्टच्या विंडोज आणि सरफेसचे नवे बॉस करण्यात आले आहेत. खरं तर यापूर्वी हे पद पॅनोस पनय यांनी भूषवले होते. आता त्यांच्यानंतर ही जबाबदारी पवन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पॅनोस यांनी गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्ट विंडोज सोडले होते.
पवन दावुलुरीने IIT मद्रासमधून पदवी प्राप्त केली आहे. यानंतर त्यांनी मेरिलँड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाले. गेल्या २३ वर्षांपासून ते मायक्रोसॉफ्टमध्ये काम करीत आहेत. पवनचा भारताशी विशेष संबंध आहे. पवन आता त्या नेतृत्व गटात सामील झाला आहे, जिथे फक्त काही भारतीय अमेरिकन कंपन्यांमध्ये नेतृत्वाच्या भूमिकेत आहेत. यामध्ये सत्या नडेला आणि सुंदर पिचाई यांसारख्या नावांचा समावेश आहे. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज आणि सरफेसचे प्रमुख बनल्यानंतर पवनला किती पगार मिळणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
मायक्रोसॉफ्टने पुन्हा एकदा विंडोज आणि सरफेस हे दोन्ही एकत्र केले आहेत. दोन्ही आघाड्यांवर विकासाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी पवन दावुलुरी यांच्याकडे नेतृत्व दिले आहे. ज्यामुळे ते एका मोठ्या टेक कंपनीत वरिष्ठ पद स्वीकारणारे सर्वात अलीकडील भारतीय बनले आहेत.
जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये नेतृत्वाची पदे भूषविणाऱ्या भारतीयांच्या वाढत्या पंक्तीत दावुलुरी हे नवे नाव आहे. हे जगातील काही प्रमुख भारतीय वंशाचे सीईओ आहेत.
