दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे टाटा पंच गाडीचे वितरण


सातारा :
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित साताराच्या सभासद श्वेता विजय जाधव यांनादीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे टाटा पंच एडवेंचर प्लस
फोर व्हीलर गाडीचे वितरण दिवाळीच्या शुभमुहूर्तावर संस्थेचे संस्थापक -चेअरमन शिरीष चिटणीस यांच्या हस्ते करण्यात आले…
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक -चेअरमन शिरीष चिटणीस, व्यवस्थापक विनायक भोसले, व्हा. चेअरमन आप्पा शालगर, भगवान नारकर, जगदीश खंडागळे, प्रदीप देशपांडे, लालासो बागवान, सुनील बल्लाळ, चंद्रशेखर बैरागी, लक्ष्मण कदम, रवींद्र कळसकर, अभिनंदन मोरे, आग्नेश शिंदे , अभिजीत देवरे, जनार्दन निपाणे , अभिजीत कुलकर्णी, रसिका सुतार, रविराज जाधव विनोद कामतेकर तसेच इतर कर्मचारी व सभासद उपस्थित होते.
या वाहन वितरण कार्यक्रमाच्या वेळी संस्थापक शिरीष चिटणीस म्हणाले दीपलक्ष्मी पतसंस्थेने सातारा शहरातील सहकारी चळवळीला एक व्यापक आधार दिला असून सभासदांची व्यक्तिगत तसेच व्यावसायिक गरज लक्षात घेऊन या सणासुदींच्या दिवसांमध्ये व्यक्तिगत वापरास तसेच व्यवसायास पूरक ठरणाऱ्या वाहनांस संस्था कर्जरूपी आर्थिक पुरवठा करून एक प्रकारे व्यवसायास चालना देण्याचे काम अविरत करत आहेत.. अशा या संस्थेने आज पर्यंत अनेक व्यवसायास पुरक ठरणाऱ्या वाहनांसाठी आर्थिक पतपुरवठा करून सभासदांची आर्थिक पत वाढवली आहे.

Advertisement

दीपलक्ष्मी पतसंस्था गेली 28 वर्ष ग्राहकाभिमुख धोरण राबवित असून कर्जाच्या विविध योजना तसेच घरगुती तसेच व्यावसायिक उपयोगासाठी वाहनांना कर्जरूपी आर्थिक पतपुरवठा करीत आहे .याचा समाजातील सुशिक्षित बेरोजगार यांनी स्वयंरोजगारासाठी तसेच व्यक्तिगत वापरासाठी कर्ज सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन सदर प्रसंगी शिरीष चिटणीस यांनी केले..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!