महाराष्ट्र तापणार


काळजी घेण्याचा हवामान खात्याचा इशारा
मुंबई
महाराष्ट्रासह देशातील ११ राज्यांमध्ये उन्हाचा पारा वाढणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे मुंबई पालिकेने रूग्णांची खबरदारी घेतली आहे. मुंबई महापालिकेकडून रूग्णालयांमध्ये २ खाटांचे शीतकक्ष उभारण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या रूग्णालयांसह तातडीच्या उपाचारांसाठी आपला दवाखाना देखील सज्ज आहे. राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
तापमानाचा पारा वाढल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. वाढत्या तापमानामुळे टरबूज, खरबूज आणि लिंबूची मागणी वाढली आहे. तर मे महिन्यात आणखी तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तापमानाचा पारा वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने उष्माघात कक्ष तयार करण्यात आला आहे.
यासह नागरिकांनी कामव्यतिरिक्त बाहेर पडू नये प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. दुसरीकडे गेल्या आठवडाभर पाऊस झाल्यानंतर आता नागपूरसह विदर्भाच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात झालीये. रविवारी नागपूर शहराचा पारा पाच अंशाने वाढलाय. पुढील चार दिवसात शहरातील तापमान 40° पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!