गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी


कुरणेश्वर ट्रस्टतर्फे २१ प्रकारची पत्री उपलब्ध

सातारा
यावर्षी [ भाद्रपद शु. ४] गणेश चतुर्थी बुधवार दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी आहे. गणेशस्थापनेच्या पूजेसाठी लागणारी २१ प्रकारची खात्रीशीर पत्री मिळणे हल्ली अवघड/अशक्य होत चालले आहे. यासाठी मागील तीन वर्षांपासून वृक्ष संवर्धन समिती आणि श्री गणपती खिंडीतील कुरणेश्वर देवस्थान ट्रस्ट, सातारा
उपलब्ध करून देत आहेत कुरणेश्वर येथील दुर्मिळ वृक्ष संवर्धन प्रकल्पातून मागील वर्षीप्रमाणेच यावर्षी आदल्या दिवशी दि. २६ रोजी दुपारनंतर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मात्र किती संच लागतील हे निश्चित कळण्यासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. ऐनवेळी निराशा टाळण्यासाठी सत्वर नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे .
संचाचे देणगीमूल्य रुपये १३०/- असेल. या उपक्रमातून जमा होणारी संपूर्ण रक्कम वृक्षसंवर्धनाचे कामासाठीच वापरली जाणार आहे, त्यामुळे देणगीमूल्यापेक्षा कितीही जास्त रक्कम आपण देऊ शकता नोंदणीची अंतिम तारीख २२ ऑगस्ट २०२५ आहे

Advertisement

संपर्कासाठी

सौ. केतकी (वर्षा) ताटके 88052 26140
सौ. सारिका कुरकुटे 99750 09441
श्री. रविंद्र नारेवाडीकर97633 60892
श्री. दीपक दीक्षित 98904 02060
श्री. अभय गोडबोले 98811 96034
श्री. अशोक गोडबोले 98220 93885
श्री. रमण वेलणकर98226 25474


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!