राहुल गांधींनी विरोधी पक्षनेता व्हावे


विस्तारित कांग्रेस कार्यकारिणीत ठराव मंजूर

Advertisement

नवी दिल्ली
2024 च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे उत्साहात आलेल्या काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना लोकसभेतले विरोधी पक्षनेते पद स्वीकारण्याची गळ घातली.विस्तारित काँग्रेस कार्यकारिणीत तसा ठराव देखील मंजूर केला. परंतु, आत्तापर्यंत कुठल्याही अधिकृत पदाच्या जबाबदारी पासून दूर राहिलेल्या राहुल गांधींनी लोकसभेतले विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारण्यापासून सध्या तरी दूर राहत “सावध” पवित्रा घेतला.
अशोका हॉटेलमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या विस्तारीत बैठकीत जबरदस्त उत्साह होता. कार्यकारिणीची बैठक सुरू होण्यापूर्वी आणि प्रत्यक्ष कार्यकारिणी मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वावर सर्व नेत्यांनी स्तुतीसुमने उधळली. काँग्रेसच्या जागा वाढल्याचे सगळे श्रेय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि बाकीच्या काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला दिले. ते एक धाडसी आणि डोळ्यात डोळे घालून बोलणारे नेते आहेत, अशा शब्दांमध्ये सगळ्या नेत्यांनी राहुल गांधींची स्तुती केली. विस्तारित काँग्रेस कार्यकारिणीने राहुल गांधींनीच आता लोकसभेतले विरोधी पक्ष नेते पद स्वीकारावे, असा ठराव या बैठकीत मंजूर केला. मात्र काँग्रेस नेत्यांनी आग्रहपूर्वक मंजूर केलेल्या या ठरावावर राहुल गांधींनी लगेच कुठली प्रतिक्रिया दिली नाही. त्या उलट आपण विचारपूर्वक निर्णय घेऊ असे मोजक्या शब्दांमध्ये त्यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांच्या शेजारी प्रियांका गांधी होत्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!