साताऱ्यात शनिवारी आशा भोसले यांच्या गीतांचा कार्यक्रम


माय बिट्स कराओके स्टुडिओ यांच्यातर्फे आयोजन
सातारा
ज्येष्ठ अष्टपैलू गायिका आशा भोसले यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम शनिवार दिनांक 18 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता महिला मंडळ हॉल, राजवाडा येथे होणार आहे.एव्हरग्रीन आशा या शीर्षकाच्या या कार्यक्रमाचे आयोजन माय बिट्स कराओके स्टुडिओने केले आहे.यावेळी कलाकार मंजिरी दीक्षित, वनिता कुंभार,सीमा रजपूत, कला चंद, प्रज्ञा सूर्यवंशी, कल्याणी इनामदार,श्रुती शहा, वैशाली पांढरे, मेघना शालगर, चित्रा भिसे ,डॉ. वाय पी चव्हाण, अल्ताफ मुल्ला,गणेश शिंदे,मनोज सावंत, उमाकांत पाटील आणि डॉक्टर लियाकत शेख हे कलाकार आशा भोसले यांनी गायलेली गाणी सादर करणार आहेत.
कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर लियाकत शेख यांनी केले असून ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे यांची आहे.निवेदन चित्रा भिसे या करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष चिटणीस व मुकुंद फडके उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आलेले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!