बहारदार मराठी गीतांजली रंगली सुरमयी श्याम
दीपलक्ष्मी हॉलमधील कार्यक्रमाला रसिकांचा प्रतिसाद
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि सुरमयी शाम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी गीतांच्या बहारदार कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भर पावसातही रसिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून कलाकारांना प्रोत्साहन दिले.या कार्यक्रमाचे संकल्पक आणि ध्वनी संयोजक असलेल्या कैलास मोहिते यांनी नितीन मुळे,श्वेता जाधव,गीतांजली पाटील आणि उर्मिला शर्मा यांच्या सहकार्याने हा बहारदार कार्यक्रम सादर केला.
भक्ती गीते, भावगीते आणि चित्रपट गीते यांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात अष्टविनायका तुझा महिमा कसा या गाण्याने झाली आणि सांगता दयाघना या अप्रतिम गाण्याने झाली. यावेळी सर्वच गायकांनी सुवर्णकाळातील मराठी गाणी सादर करून रसिकांना तृप्त केले
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विजय जंगम,शिरीष चिटणीस मुकुंद फडके विजय यादव सुनील राठी उपस्थित होते.
यावेळी शिरीष चिटणीस,सुनील राठी आणि विजय यादव यांनीही काही गाणी सादर केली.
मुकुंद फडके यांनी मराठी गीतांचे महत्त्व विशद करताना मराठी कलाकारांनी अजरामर अशा संगीताची निर्मिती केल्याचेही सांगितले.मराठी गायक आणि संगीतकारांनी हिंदीमध्येही आपला ठसा उमटवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमाच्या प्रारंभी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली.