नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का


उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदी-अमित शाहांवर पलटवार

पालघर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंकडे असलेल्या शिवसेनेचा उल्लेख नकली असा केला. या टीकेवर उद्धव ठाकरेंनी पालघरमध्ये झालेल्या जाहीर सभेतून पलटवार केला आहे.नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे
‘गद्दारांचे मालक महाराष्ट्रात फिरत आहेत, कोण गद्दार आणि कोण मालक तुम्हाला माहिती आहे. यापुढे मी जी टीका करणार आहे ती टीका मी नरेंद्र मोदींवर करणार आहे, पंतप्रधानांवर नाही. कारण मी देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करू इच्छित नाही’, एकतर तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी? महाराष्ट्राच्या बाहेरचे आहात तुम्ही. महाराष्ट्रात येऊन तुम्ही शिवसेनेला नकली म्हणता. नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का? असं उद्धव ठाकरे म्हणाले.’
‘तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह पळवून नेलं, माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरेंना संपवायला निघालात, ही यांची वृत्ती आहे. आम्ही चूक केली. मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून पालघरमध्ये येऊन प्रचार केला. नकली सेना म्हणून आमची टिंगल टवाळी करतायत, पण अमित शाह तुमच्या गाडीमध्ये अस्सल भाजपचे लोक किती राहिले आहेत बघा, का सगळ्या स्टेपन्या आत बसल्या आहेत. असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना दिलं.

Advertisement

‘उद्धव ठाकरे तुम्ही संपवला आहात, तर प्रत्येक सभेत उद्धव ठाकरेंचा उद्धार केल्याशिवाय तुमचं भाषण पूर्ण का होत नाही. अमित शाहांनी चीनला उत्तर दिलं पाहिजे, तिकडे शेपट्या घालतात. चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे. तुम्हाला निवडून दिलं होतं देशाचे शत्रू चीन-पाकिस्तानला संपवण्यासाोठी दिलं होतं. इकडे फणा काढून बसता आणि तिकडे शेपट्या घालून बसता’, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!