सहा बाईक ३७६ वेळा पोटावरून नेल्या


पंडित धायगुडे यांच्या विश्वविक्रमाची ग्रिनीजमध्ये नोंद

Advertisement

मुंबई
मूळचे सांगलीचे आणि नोकरीनिमित्त ठाण्यात आलेले पंडित तुकाराम धायगुडे यांनी २५७ किलो वजनाच्या सहा बाइक लागोपाठ ३७६ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.७ मे २०२३ रोजी धायगुडे यांनी हा विश्वविक्रम ठाण्यातील कोपरी येथील धर्मवीर क्रीडा संकुलात केला होता यानंतर तब्बल १० महिन्यानंतर त्यांच्या या विश्वविक्रमाची नोंद ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली असून त्यांना तसे प्रमाणपत्र ग्रिनीज बुकने बहाल केले आहे.मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा विश्वविक्रम झाल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाईचे काम करणाऱ्या पंडित धायगुडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२००९ पासून त्यासाठी प्रयत्न करत होतो. अखेर ते स्वप्न पूर्ण झाल्यानं भरून पावलो,त्यामुळे मला या विश्वविक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो अशा भावना पंडित धायगुडे यांनी व्यक्त केल्या.
धायगुडे यांनी याआधी देखील २५७ किलो वजनाच्या दोन बाइक लागोपाठ १२२ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत विश्वविक्रमाला गवसणी घातली होती.त्यानंतर रविवार ७ मे २०२३ रोजी त्यांनी आपलाच विक्रम मोडीत काढत २५७ किलो वजनाच्या सहा बाइक लागोपाठ ३७६ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत विश्वविक्रम केला.पंडित धायगुडे यांच्या या विक्रमाचे सर्व माहिती व्हिडिओ सकट ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्डला पाठवण्यात आली होती त्यानंतर त्यांनी या सर्व बाबीची तपासणी करून तब्बल १० महिन्यानंतर पंडित धायगुडे यांच्या विश्वविक्रमाची नोंद ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये केली आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!