लोणावळ्यात नंगानाच सुरूच


बंगल्यात नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
लोणावळा
बंगल्याच्या अंगणात रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीर साउंड सिस्टम लावून मुलींकडून अश्लील नृत्य करून घेणाऱ्या आणि नृत्य करणाऱ्या नृत्यांगनावर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतलं आहे. बंगला भाड्याने देताना याबाबतची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. अन्यथा बंगला मालकांवर देखील कारवाई केली जाणार आहे. असा इशारा सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिला आहे.
लोणावळ्यात अवघ्या देशात नागरिक येत असतात. लोणावळ्यातील तुंगार्ली येथे बंगला भाड्याने घेऊन नृत्यांगनाकडून अश्लील हावभाव करून नाच करवून घेणाऱ्या व्यक्तींसह नऊ जणांना लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रात्री उशिरापर्यंत साउंड सिस्टीमवर गाणे वाजवून इतरांची झोप मोड करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. लोणावळा आणि परिसरातील बंगले भाड्याने देताना बेकायदेशीर कृत्य होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असून याबाबत ची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. अन्यथा बंगला मालकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!