प्रकाशरेषा पुस्तक हा एक संग्राह्य दस्तऐवज
पुस्तकावरील चर्चासत्रामध्ये मान्यवर वक्त्यांचा सूर
सातारा
साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे यांनी लिहिलेले प्रकाशरेषा हे पुस्तक म्हणजे एक संग्राह्य दस्तऐवज असल्याचे मत या पुस्तकावरील चर्चासत्र कार्यक्रमात सर्वचमान्यवर वक्त्यांनी व्यक्त केले या पुस्तकाची सार्वकालिक उपयुक्तता असून एक रेफरन्स बुक म्हणून हे पुस्तक महत्त्वाचे ठरू शकते असेही मत या कार्यक्रमात व्यक्त झाले
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि आम्ही पुस्तक प्रेमी ग्रुप यांच्या पुढाकारातून दीपलक्ष्मी सभागृह येथे श्रीकांत कात्रे यांच्या प्रकाशरेषा या पुस्तकावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते यावेळी छत्रपती प्रतापसिंग महाराज [थोरले ] नगर वाचनालय साताराच्या ज्येष्ठ संचालक डॉक्टर ज्योत्स्ना कोल्हटकर यांचा सुद्धा त्यांना विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला यावेळी विनोद कुलकर्णी यांचे हस्ते श्रीकांत कात्रे यांचा आणि हरीश
पाटणे यांच्या हस्ते ज्योत्स्ना कोल्हटकर यांचा सत्कार करण्यात आला
त्यानंतर झालेल्या चर्चासत्राची सुरुवात करताना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कोषाध्यक्ष आणि सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले, श्रीकांत कात्रे यांनी आयुष्यभर विधायक पत्रकारिता केली आणि त्याचे दर्शन त्यांच्या या प्रकाशरेषा या पुस्तकातून उमटत आहे सातारकरांना परिचित असणाऱ्या अनेक व्यक्तीचित्रांचा त्यांनी पुन्हा एकदा नव्याने परिचय करून दिला आहे त्यामुळे आधुनिक काळामध्ये सुद्धा हे पुस्तक महत्त्वाचे ठरणार आहे श्रीकांत कात्रे यांच्याकडून आगामी कालावधीमध्ये अशाच प्रकारे लिखाणाची अपेक्षा आहे
मराठी पत्रकार संघ सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आणि पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी सुद्धा या पुस्तकावर मतप्रदर्शन करत असताना श्रीकांत कात्रे यांच्या शैलीचा उल्लेख केला श्रीकांत कात्रे यांनी या पुस्तकांमध्ये ज्या विविध व्यक्तीचित्रांचे रेखाटन केले आहे ते सर्व निश्चितच दीपस्तंभ असून आधुनिक काळातही ही व्यक्तीचित्रे निश्चितच मार्गदर्शक ठरू शकतात असेही हरीश पाटणे यांनी स्पष्ट केले
विनोद कुलकर्णी आणि हरीश पाटणे यांनीआपल्या भाषणात यावेळी पत्रकार संघटनेच्या कामाचीही माहिती दिली

ज्येष्ठ पत्रकार आणि न्यूजमंडी न्यूज पोर्टलचे संपादक मुकुंद फडके यांनी प्रकाश रेषा या पुस्तकातील विविध पैलूंचा उलगडा केला. ते म्हणाले,श्रीकांत कात्रे यांनी अतिशय सोप्या आणि सहज शैलीमध्ये या पुस्तकाची मांडणी केली आहे प्रत्येक व्यक्तिचित्रासाठी जे हेडिंग देण्यात आले आहे ते समर्पक असून त्या हेडिंगमुळे ती व्यक्ती समोर येते कोणत्याही प्रकारच्या विशिष्ट शैलीचा किंवा शब्दबंबाळ पद्धतीचा अट्टाहास न करता अतिशय सोप्या पद्धतीने श्रीकांत कात्रे यांनी या व्यक्तीचित्राची मांडणी केल्यामुळे ती वाचकांच्या मनापर्यंत पोहोचतात
एक रेडी रेकनर किंवा एक रेफरन्स बुक म्हणून या प्रकाशरेषा या पुस्तकाचे निश्चितच मोठे मूल्य असून आगामी कालावधीमध्ये श्रीकांत कात्रे यांनी अशाच काही व्यक्तीचित्रांचे चित्रण करावे त्याचीही पुस्तके प्रकाशित करावीत अशा शुभेच्छाही मुकुंद फडके यांनी यावेळी दिल्या
दैनिक सकाळचे सहयोगी संपादक राजेश सोळस्कर यांनी श्रीकांत कात्रे यांनी जेव्हा ही व्यक्तीचित्रे लिहिली तेव्हा आपण त्या कालावधीमध्ये त्यांच्यासोबत होतो याबाबत अनुभव सांगितले या पुस्तकातील व्यक्तीचित्रे निश्चितच आधुनिक काळातही समाजाला मार्गदर्शक ठरू शकतात असेही त्यांनी अधोरेखित केले
पुस्तक प्रेमी समूहाचे संदीप श्रोत्री यांनी प्रास्ताविक केले आणि या कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.
दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनीआभार मानताना या कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले आणि भविष्यातही असे साहित्यविषयक कार्यक्रम दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून घेतले जातील अशी ग्वाही दिली
यावेळी सत्कारमूर्ती श्रीकांत कात्रे आणि ज्योत्स्ना कोलटकर यांनीही मनोगत व्यक्त केले आणि या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केल्यामुळे अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते असे स्पष्ट केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही कुलकर्णी यांनी केले

