कोडोली येथे मतदान जागृती अभियान


सातारा
पन्नास टक्के पेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांवर विशेष मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत कोरेगाव विधानसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणाऱ्या कोडोली येथील कमी मतदान झालेल्या विविध मतदान केंद्रांच्या अनुषंगाने कोडोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मतदान जागृती करण्यात आली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे, गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, बालविकास प्रकल्प अधिकारी तथा जागृती विभागाचे समन्वय अधिकारी सुजितकुमार इंगवले पथक प्रमुख यशेंद्र क्षीरसागर कृषी विस्तार अधिकारी संजय बर्गे, पथकाचे सदस्य मंगेश घाडगे उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मेळावे घेण्यात आले. मेळाव्यांना ब्लॉक लेवल ऑफिसर ,नागरिक ,पालक उपस्थित होते .यावेळी गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे म्हणाले . “कमी मतदान असणाऱ्या केंद्रांवर विशेष जागृती गरजेची आहे. सुदृढ लोकशाहीसाठी उत्कृष्ट मतदान गरजेचे आहे. 50% पेक्षा कमी मतदान होणे हे भूषणावह नसून येथील मतदान वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वच नागरिकांनी जागरूक राहावे. स्वतः मतदान करावे आणि इतरांनाही मतदान करण्यास उद्युक्त करावे.”यावेळी मतदानाची शपथ सर्व उपस्थित नागरिकांना देण्यात आली. विविध उपक्रम राबविण्याचे यावेळी नियोजन करण्यात आले.
बालविकास प्रकल्प अधिकारी सुजितकुमार इंगवले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सायकल रॅली विद्यार्थ्यांनी काढली आणि मतदानाविषयी घोषणा दिल्या.श्री क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. केंद्रप्रमुख श्रीमती उज्वला कुलकर्णी यांनी आभार मानले

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!