इंडिया आघाडीशी संपर्क नको :एकनाथ शिंदे


संसदेत शिवसेना गटनेतेपदी श्रीकांत शिंदे

Advertisement

मुंबई
इंडिया आघाडीतील कोणत्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खासदारांना दिल्या आहेत.लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने 15 पैकी सात जागा जिंकल्या आहेत. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे.संसदेत शिवसेना गटनेते म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावावर खासदारांनी एकमत केलं आहे. उद्या (7 जून) खासदारांच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, आज (6 जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नव्या खासदारांची बैठक घेत खासदारांचे अभिनंदन केले. तसेच इंडिया आघाडीतील कोणत्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या खासदारांना दिल्या आहेत. बैठक वर्षा बंगल्यावर पार पडली. या बैठकीमध्येच खासदारांना सूचना देण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीला रवाना होणार आहेत. तत्पूर्वी, शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी खासदारांचं अभिनंदन केले.
या स्नेह भोजनासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह नरेश मस्के, प्रतापराव जाधव, खासदार संदीपान भुमरे, धैर्यशील माने खासदार रवींद्र वायकर खासदार श्रीरंग बारणे माजी खासदार संजय मंडलिक राहुल शेवाळे कृपाल तुमाने आमदार संजय शिरसाठ उपस्थित होते. दरम्यान, एनडीए सरकार स्थापनेसाठी दिल्लीमध्ये हालचाली सुरू असतानाच मित्र पक्षांना काय मिळणार? याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, एनडीएमध्ये एकनाथ शिंदे यांचे सात खासदार सुद्धा महत्त्वपूर्ण आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला दोन राज्यमंत्री एक केंद्रीय मंत्रीपद मिळू शकते.मंत्रिपदासाठी प्रतापराव जाधव यांचे नाव सुद्धा आघाडीवर असून धैर्यशील माने यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
शिवसेना शिंदे गटाने सात जागांवर विजय मिळवला आहे. बुलढाणा, औरंगाबाद, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम मावळ आणि हातकलंगले या मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून विजय मिळवला आहे. मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. सर्वाधिक मताधिक घेण्यात श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. ते दोन लाख 9144 मतांनी विजयी झालेय. औरंगाबादचे संदिपान भुमरे हे एक लाख 34 हजार 650 मतांनी विजयी झाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!