मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा
जनजागृती पथकाचे समन्वय अधिकारी सुजितकुमार इंगवले यांचे आवाहन
सातारा
मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे .मतदानाचा अधिकार हा आपणास राज्यघटनेने दिलेला आहे. कमी मतदान होणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाही. शंभर टक्के मतदान ही आदर्श अवस्था निर्माण होणे अत्यावश्यक आहे”, असे प्रतिपादन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या जनजागृती पथकाचे समन्वय अधिकारी तथा बालविकास प्रकल्प अधिकारी सुजितकुमार इंगवले यांनी केले .50 टक्के पेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांवर विशेष मोहीम जनजागृतीसाठी राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये समाविष्ट असणाऱ्या राजापूर येथे बोलताना त्यांनी मतदानाचे महत्त्व विशद केले. यावेळी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका,कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदान जनजागृती पूर्ण क्षमतेने प्रशासन करीत आहे. 50 टक्के पेक्षा कमी मतदान असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. यावेळी श्री. इंगवले म्हणाले,” जास्तीत जास्त मतदान हा प्रगल्भ लोकशाहीचा आत्मा आहे .मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस न समजता त्यादिवशी मतदानाचे पवित्र कार्य पार पाडावे. राष्ट्राची समृद्धी, विकास आणि भावी भावी पिढीचे उज्ज्वल भवितव्य निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी लोकशाहीच्या या उत्सवात मनापासून सहभागी व्हायला हवे. स्वतः मतदान कराच आणि इतरांना मतदानाची आठवण करून द्या. त्यांना उद्युक्त करा.मतदानाचे महत्त्व समजावून द्या. मतदान हा केवळ अधिकार नसून ती एक जबाबदारी आहे.”पथकप्रमुख श्री. यशेंद्र क्षीरसागर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
