सोमवारी साहित्य पुरस्कार वितरण सोहळा


महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरीतर्फे आयोजन
सातारा
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी सातारा यांनी जाहीर केलेल्या साहित्य पुरस्कारांचा वितरण सोहळा सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता पाठक हॉल नगर वाचनालय येथे होणार आहे
अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे यावेळी श्रीनिवास विनायक कुलकर्णी, विद्या पोळ, पद्माकर पाठकजी,निलेश महिगावकर आणि डॉक्टर मोहन सुखटणकर यांचा साहित्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे
या सोहळ्याला सर्व साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष आणि शाहूपुरी शाखेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कुलकर्णी ,शाहूपुरी शाखेचे विद्यमान अध्यक्ष नंदकुमार सावंत,कार्याध्यक्ष चंद्रकांत बेबले, उपाध्यक्ष विक्रम पाटील, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने आणि कोषाध्यक्ष सचिन सावंत यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!