अष्टगंधारमध्ये गुरुवारी एस पी बालसुब्रम्हण्यम यांची गाणी
दीपलक्ष्मी पतसंस्था आणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुपतर्फे आयोजन
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अष्टगंधार” आठ गायकांची खास मालिका मधील भाग आठवा हा गुरुवार २९ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत दीपलक्ष्मी सांस्कृतिक एसी हॉलमध्ये आयोजित केला आहे. हा कार्यक्रम व्हॉईस मॉड्युलेशन किंग अशी ओळख असणारे दिग्गज गायक एस पी बालसुब्रम्हण्यम यांच्या गाण्यांवर आधारित आहे. तसेच रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे प्रमोद लोंढे हा कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शशिकांत पवार, यशेंद्र क्षीरसागर, काका पाटील ,सुनील साबळे, सौ. सुरेखा शेजवळ, तसेच दीपलक्ष्मीचे चेअरमन शिरीष चिटणीस हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे प्रमोद लोंढे यांची आहे व निवेदन सौ राधिका काळे यांचे आहे.प्रमोद लोंढे यांचे सोबत रॉयल चे इतर गायक त्यांना साथ संगत देणार आहेत.
तरी ह्या कार्यक्रमास सर्व रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गायक कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन दीपलक्ष्मीचे चेअरमन शिरीष चिटणीस व रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप तर्फे करण्यात येत आहे.