स्वामी विवेकानंदांचे चरित्र आणि कार्य अलौकिक


वसंत व्याख्यानमालेमध्ये प्रसाद चाफेकर यांचे प्रतिपादन

सातारा
भारतीय अध्यात्मिक क्षितिजावरील महत्त्वाचे व्यक्तिमत्व असलेले स्वामी विवेकानंद यांचे चरित्र व कार्य अलौकिक होते भारतीय अध्यात्मिक शक्ती जगभरात पोहोचवण्याचे मोठे काम स्वामी विवेकानंद यांनी केले असे प्रतिपादन प्रसाद चाफेकर यांनी केले
ज्ञानविकास मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये स्वामी विवेकानंद चरित्र व कार्य या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते
यावेळी बोलताना प्रसाद चाफेकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या समग्र चरित्राचा आढावा घेतला अलौकिक बुद्धीचे वरदान लाभलेल्या नरेंद्रनाथ याचे स्वामी विवेकानंद म्हणून झालेले रूपांतर, गुरु रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांचे गुरु शिष्य संबंध याबाबत प्रसाद चाफेकर यांनी काही कथा सांगितल्या
शिकागो येथील धर्म परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना बंधू आणि भगिनींनो या दोन शब्दांच्या जोरावर स्वामीजींनी संपूर्ण परिषद आणि अमेरिकन नागरिकांना जिंकून घेतले असेही प्रसाद चाफेकर यांनी सांगितले

Advertisement

 


उठाजागे व्हा आणि आपले ध्येय मिळवण्यासाठी कार्यरत रहा असा संदेश स्वामीजींच्या चरित्रातून सतत मिळत असतो असेही प्रसाद चाफेकर यांनी स्पष्ट केले
यावेळी व्यासपीठावर अरुण राजहंस शाम चितळे मोहन साठे उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!