स्वस्तिश्री’ मराठी-हिंदी गाण्यांचा स्वरोत्सव
२६ सप्टेंबरला साताऱ्यात सांगीतिक मेजवानी
सातारा:
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संगीतप्रेमींसाठी एका भव्य सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता साताऱ्यातील दीपलक्ष्मी सभागृह येथे ‘स्वस्तिश्री’ हा मराठी आणि हिंदी गाण्यांचा बहारदार स्वरोत्सव रंगणार आहे. संगीतकार राजेंद्र रानडे आणि सौ. उज्ज्वला करंबेळकर यांच्या संकल्पनेतून आणि सादरीकरणातून हा कार्यक्रम रसिकांच्या भेटीस येत आहे. या स्वरोत्सवात अनेक गायक आपले कलागुण सादर करणार आहेत. यामध्ये सौ.प्रज्ञा लाटकर, सौ. उज्ज्वला करंबेळकर, सौ. सुजाता नावंधर, संतोष वाघ,गोडसे सर आणि बाळासाहेब पाटील या गायकांच्या सुमधूर आवाजात मराठी व हिंदीतील सदाबहार गाणी ऐकण्याची संधी सातारावासियांना मिळणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा शेजवळ, डॉ. कामिनी पाटील, शिरीष चिटणीस, राजेंद्र रानडे, मुकुंद फडके आणि डॉ. हेमलता गोखले उपस्थित राहणार आहेत.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने आयोजित केलेल्या या सुरांच्या महोत्सवाला साताऱ्यातील सर्व संगीतप्रेमींनी, नागरिकांनी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

