कर्मवीरांच्या १३९व्या जयंती निमित्त व्याख्यानमाला

कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे आयोजन
सातारा
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वर्ये सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 23 सप्टेंबर रोजी माननीय प्राचार्य शहाजी डोंगरे, सदस्य, मॅनेजींग कौन्सिल, रयत शिक्षण संस्था सातारा, दिनांक 24 सप्टेंबर रोजी माननीय ॲड. रवींद्र पवार सदस्य मॅनेजिंग कौन्सिल रयत शिक्षण संस्था सातारा, दिनांक 28 सप्टेंबर रोजी प्राचार्य डॉक्टर जनार्दन जाधव माजी सचिव रयत शिक्षण संस्था सातारा, दिनांक 29 सप्टेंबर रोजी माननीय प्राचार्य डॉक्टर अशोक भोईटे माजी सचिव रयत शिक्षण संस्था सातारा व दिनांक 30 सप्टेंबर रोजी माननीय डॉक्टर मोहन आप्पासाहेब पाटील नामवंत त्वचारोग तज्ञ व जनरलबॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा यांची व्याख्याने होणार आहेत. तरी इच्छुकांनी या व्याख्यानामालेतील व्याख्यांनाना उपस्थित राहावे असे आवाहन इन्स्टिट्यूट संचालक डॉक्टर बी एस सावंत यांनी केले आहे.

