साताऱ्यात शुक्रवारी डीजे विरोधात मूक मोर्चा


सातारा शहरातील २१ संस्थांचा सहभाग

Advertisement

सातारा
डीजे आणि लेझर विरोधी आंदोलनात आता एकूण २१ संस्था या डीजे आणि लेझर विरोधात उभ्या ठाकल्या आहेत.अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ठीक ५.३० वाजता सर्वजण राजवाड्यावर एकत्र भेटणार असून यावेळी सर्व संस्थांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीपासून हे डीजे आणि लेझर लाईट सर्व मिरवणुकांमधून, उत्सवांमधून हद्दपार होण्यासाठी या संस्थांनी खूप प्रयत्न केले. गेल्या वर्षीदेखील मोर्चाकाढला. शुक्रवारचा हा मोर्चा राजवाडा ते पोलीस करमणूक केंद्र या मार्गावर मार्गक्रमण करणार आहे. घोषणा न देता केवळ डीजे आणि लेझर विरोधी फलक उंचावून या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत .यावर्षी साताऱ्यातील प्रथितयश डॉक्टर मंडळी तसेच अनेक महिला मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि प्रत्येकाने आपल्याबरोबर किमान पाच मित्र किंवा मैत्रिणींना घेऊन यावे. असे आवाहन आयोजक प्रसाद चाफेकर यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!