मोदींची शक्ती कमी करणं गरजेचे


सातारा येथे शरद पवार यांची गर्जना

Advertisement

सातारा :
भाजप आणि नरेंद्र मोदींची एक एक जागा कमी करणे, मोदींची संसदेतील संख्या कमी करणे, त्यांची शक्ती कमी करणे ही देशाची गरज आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारयांनी साताऱ्यातून केली.
सातारा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी पवार बोलत होते. पुरोगामी विचारांना सातारची जनता नेहमीच पाठिंबा देते. श्रीनिवास पाटील यांनाही सातारकरांनी निवडून दिले. गेल्यावेळी आघाडी नव्हती आता आघाडी आहे. एक एक जागा निवडून आणण्यासाठी इंडिया आघाडी काम करत आहे.
शरद पवार म्हणाले, देशाची सत्ता मोदींच्या हाती आहे. मागील १० वर्ष त्यांच्याकडे राज्य आहे आणि हिशोब मला मागतात.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात मी काय काम केले त्याचे उत्तर देऊ शकतो.इंडिया आघाडीच्या उमेदवारांना समाजातील सर्व घटकांना पाठिंबा आहे,
शरद पवार म्हणाले, विरोधकांकडे सांगण्यासारखे दुसरे काही नाही. शशिकांत शिंदेंना लोकांचा प्रतिसाद मिळतोय हे पाहून त्यांच्यावर आरोप लावले जातेय. आपलं नाणं खणखणीत आहे. लोकांमध्ये शशिकांत शिंदे यांच्याबद्दल आपुलकी आहे. सातारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाणांपासून अनेक कर्तृत्त्वान लोकांची फळी निर्माण झाली.त्यांच्या विचारांचा पगडा आजही लोकांवर आहे. हजारोंच्या संख्येने लोक आज शशिकांत शिंदेंचा अर्ज भरण्यासाठी आले.देशातील लोकांना परिवर्तन हवे आहे. त्याचे पहिले पाऊल साताऱ्यातून टाकले आहे.आमच्या लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम सातारकरांनी केले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!