मधुसूर स्पर्धा उत्साहात संपन्न
महाराष्ट्रातून १०६ स्पर्धकांचा सहभाग
सातारा
स्व. नानासाहेब द्रविड स्मरणार्थ मधुसूर राज्यस्तरीय स्पर्धा ( वर्ष ५ वे ) सातारा जिल्हा बँकेच्या सभागृहात मोठ्या दिमाखात संपन्न झाली. दोन दिवसांच्या स्पर्धेमध्ये शास्त्रीय गायन आणि सुगम संगीत या प्रकारात विविध जिल्ह्यातून १०६ स्पर्धकांचा सहभाग होता. स्पर्धेचे उद्घाटन बँकेचे सीइओ डॉ. राजेंद्र सरकाळे, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांच्या हस्ते झाले. मा. ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री, मा. ना. मकरंद आबा पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री, मा.खा. नितीन काका पाटील यांनी स्पर्धेला शुभेच्छा देऊन स्पर्धकांना प्रोत्साहित केले. बक्षीस समारंभ ज्येष्ठ वाद्यनिर्माते बाळासाहेब मिरजकर, ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक, सातारा विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली जाधव, ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. परीक्षक म्हणून डॉ. अनघा धायगुडे, डॉ. शीतल धर्माधिकारी, श्री. रवींद्र क्षीरसागर, श्री. अरविंद काडगावकर यांनी काम पाहिले. स्पर्धकांना तबला साथ शांताराम दयाळ, विश्वनाथ पुरोहित यांनी तर संवादिनी साथ वैभव साने, दौलत खंडझोडे यांनी केली. निवेदनाची धुरा वैदेही कुलकर्णी, स्वप्नजा बर्वे यांनी सांभाळली. समन्वयक म्हणून बाळासाहेब चव्हाण यांनी काम पाहिले. स्पर्धेला ॲड राजगोपाल द्रविड, ॲड गणेश धावडे, ॲड लक्ष्मीकांत अघोर, ॲड प्रणव टोणपे, ॲड निलेश देशपांडे, ॲड आदिती कासार, ॲड स्नेहल कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, सौ. हेमा द्रविड, मकरंद वझे, जयंत सहस्रबुद्धे, अजित सहस्रबुद्धे, सौ.कविता अभ्यंकर, अर्जुन यादव, संकेत पुराणिक, मीना सुपनेकर, सुभाष कुंभार, अमोल जोशी यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे आयोजक ॲड अमित द्रविड यांनी आभार मानले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :
शास्त्रीय गायन : किशोर गट ( १० ते १८ वर्षे)
प्रथम क्रमांक : स्वरानंद परांडे, परभणी
द्वितीय क्रमांक : अनन्या होंकण, पुणे
तृतीय क्रमांक : युगंधरा दाभाडे, सातारा
उत्तेजनार्थ : सई जोग, सातारा
खुला गट ( १८ वर्षांवरील ) :
प्रथम क्रमांक : पल्लवी पिळणकर
द्वितीय क्रमांक : चिन्मय कुलकर्णी
तृतीय क्रमांक : स्वागता पोतनीस
उत्तेजनार्थ : पार्थ घासकडवी
उत्तेजनार्थ : पियुशा भोसले
सुगम संगीत :
बाल गट ( तिसरी ते सातवी ) :
प्रथम क्रमांक : अर्णव बोपलकर, ठाणे
द्वितीय क्रमांक : तनया सरवटे, सातारा
तृतीय क्रमांक : विहिका शाह, सातारा
उत्तेजनार्थ प्रथम : वाग्मी भिडे, सातारा
उत्तेजनार्थ द्वितीय : अनन्या होंकण, पुणे
उत्तेजनार्थ तृतीय : सान्वी शिंदे, कराड
कुमार गट ( आठवी ते दहावी) :
प्रथम क्रमांक : शिवराज इंगवले, कराड
द्वितीय क्रमांक : पर्णिका हिरेमठ, कोल्हापूर
तृतीय क्रमांक : अदिती भराडे, कोल्हापूर
उत्तेजनार्थ प्रथम : अपूर्वा जावळे, इचलकरंजी
उत्तेजनार्थ द्वितीय : मुक्ता गोगटे, कोल्हापूर
उत्तेजनार्थ तृतीय : इरा शिंदे, सातारा

