शुक्रवारपासून ब्रम्हेन्द्रस्वामी पुण्यतिथी महोत्सव
धावडशी येथे आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
सातारा
श्रीक्षेत्र धावडशी येथे शुक्रवार दिनांक 25 जुलै ते सोमवार दिनांक 4 ऑगस्ट या कालावधीमध्ये श्रीमंत परमहंस श्री ब्रह्मेंद्रस्वामी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे
श्रीदेव भार्गवराम देवस्थान धावडशी यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे या निमित्त आठवडाभर किर्तन प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रविवर दिनांक 3 ऑगस्ट रोजी महाप्रसाद होणार आहे सोमवार दिनांक 4 जुलै 4 ऑगस्ट रोजी भास्कर बुवा काणे यांचे कीर्तन होणार आहे
दररोजची कीर्तने सकाळी नऊ ते साडेअकरा या कालावधीत होणार असून सोमवार दिनांक 4 ऑगस्टचे किर्तन संध्याकाळी सहा ते आठ या कालावधीमध्ये होणार आहे भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव भार्गवराम देवस्थान तर्फे देवेंद्र तांबे यांनी केले आहे

