बीएस्सी कॉंप्यूटर सायन्स पदवीधारकांना एमई, एमटेक पदवीसाठी प्रवेश


सातारा
चार वर्ष कालावधीचा बीए्स्सी संगणक शास्त्र ऑनर्स किंवा संशोधन ही पदवी एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्था विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता थेट एम ई, एमटेक पदवीसाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचे केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ.बी.एस.सावंत यांनी सांगितले.
एआयसीटीई नवी दिल्ली अधिनस्त असलेल्या तंत्रशिक्षण नियंत्रण करणाऱ्या केंद्र शासनाच्या कौन्सिलने दि १४ ऑगस्ट रोजी नवा निर्णय जाहीर केला. यात
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व विद्यापीठ अनुदान आयोग परिनियम दि. २६ मार्च २०२५ नुसार आंतर विद्याशाखीय शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरूणांना अद्यावत तंत्रशिक्षण मिळण्यासाठी ४ वर्ष कालावधीचा बीए्स्सी संगणक शास्त्र ऑनर्स किंवा संशोधन ही पदवी एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून केलेली असेल अशा विद्यार्थ्यांना. एम ई एम टेक संगणकशास्त्र या पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येणार आहे.
बारावी (शास्त्र शाखा ) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी बीएससी (संगणक शास्त्र) पदवी घेऊन एम ई किंवा एम टेक करता येणार आहे. याबाबत वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्युट येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याचे संचालक डॉ‌.बी. एस. सावंत यांनी सांगितले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!