साताऱ्यात सोमवारी मुकेश यांना गाण्यातून मानवंदना


सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा व विजय साबळे यांच्या संयुक्त विद्यमाने आवाज एक फनकार अनेक हा गाण्यांचा कार्यक्रम सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 30 वाजता दिपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रसिद्ध गायक मुकेश यांच्या अजरामर गीतांना मानवंदना म्हणून हा कार्यक्रम होणार असून
विविध अभिनेत्यांसाठी मुकेश यांनी गायलेल्या अविस्मरणीय गीतांची सुरेल मैफल विजय साबळे यांच्या सादरीकरणातून अनुभवता येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश गवळी, श्रीकांत कात्रे,मुकुंद फडके,राजेंद्र सुरवसे, सुहास शिंदे,बशीर बागवान, शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती विजय साबळे यांची असून सुसंवाद स्मिता शेरकर साधणार आहेत.
ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे सांभाळणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!