उज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती
मुंबई
सरकारी वकील म्हणून काम पाहणारे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीने कायद्याच्या क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व संसदेच्या सभागृहात प्रतिनिधित्व करणार आहेत.त्यांच्यासोबतच सी. सदानंदन मस्ते, हर्षवर्धन श्रृंगला आणि मीनाक्षी जैन यांचीही राज्यसभेसाठी निवड झाली आहे.
खासदार म्हणून निवड झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता. 8. 44 वाजता मला त्यांनी फोन केला आणि मराठीत म्हणाले, हिंदीत बोलू की मराठीत. मी त्यावर उत्तर देत म्हटले तुमचे दोन्ही भाषेंवर प्रेम आहे. त्यांनी माझ्यासोबत मराठीत संवाद साधला. राष्ट्रपती निवड असल्याने माझ्यावर मोठी जबाबदारी असेल, असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटले.
उज्ज्वल निकम यांच्यासोबतच केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मस्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी चार सदस्यांची निवड केली आहे. यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज रविवारी केंद्र सरकारच्या अधिसूचनेद्वारे करण्यात आली.
दहशतवादी अजमल कसाबविरुद्धचा खटला लढवण्यासाठी ते ओळखले जातात. उज्ज्वल निकम यांचा जन्म जळगाव येथे झाला. त्यांचे वडील देवराव माधवराव निकम हे देखील बॅरिस्टर होते. जळगाव येथील एस.एस. मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले. उज्ज्वल निकम यांनी टी सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची हत्या, भाजप नेते प्रमोद महाजन यांची हत्या आणि मुंबई सामूहिक बलात्कार यासारखे हायप्रोफाइल खटले देखील लढले आहेत. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली

