उमेद जेष्ठ नागरिक संघाची साताऱ्यात स्थापना
सोमवार दिनांक १७ रोजी पदग्रहण समारंभ
सातारा
साहित्य, संस्कृती,परिवहन, वैद्यकीय, कायदा,कारखाने,पत्रकारिता, बँकिंग,वीजसेवा ,शिक्षण अशा विविध क्षेत्रात कार्यक्षमपणे काम करून आपापल्या आस्थापनांना समाजात दर्जात्मक स्थान मिळूवून देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन त्यांच्या व समाजाच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रात कार्य करण्यासाठी “उमेद जेष्ठ नागरिक संघ स्थापन केला आहे.या संघांचे उदघाट्न येत्या सोमवार दि 17ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता जेष्ठ विचारवंत, व्याख्याते प्राचार्य यशवंत पाटणे ह्यांचे हस्ते होणार आहे.या कार्यक्रमास पुणे प्रादेशिक फेस्कोम कार्यालयाच्या संचालिका व जेष्ठ साहित्यिका सौ सुजाता कानेटकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघांचे अध्यक्ष अशोकराव कानेटकर भूषविणार आहेत.
हा कार्यक्रम धन्वंतरी पतसंथा सभागृह, गुरुवार पेठ सातारा येथे संप्पन्न होणार आहे.याच कार्यक्रमात संघाच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ व मान्यवरांचे वाढदिवस साजरे केले जाणार आहेत.या कार्यक्रमासाठी फेस्कोम पुणे ह्या संस्थेचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघांचे अध्यक्ष अशोकराव कानेटकर,उपाध्यक्ष गोपाळराव खजूरे, कार्याध्यक्ष दिलीपराव चरेगावकर सचिव विजयकुमार फडणीसव आणि प्रसिद्धी प्रमुख मुकुंद फडके व कार्यकारणी सदस्यांनी केले आहे.


उमेद जेष्ठ नागरिक संघ कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अशोक कानेटकर अध्यक्ष ,गोपाळ खजूरे उपाध्यक्ष,दिलीप चरेगावकर. कार्याध्यक्ष ,विजयकुमार फडणीस. सचिव ,गजानन घाडगे कोषध्यक्ष,प्रा प्रकाश सुतार संघटक,दिलीप गरुड. जिल्हा समन्वयक ,विश्वास लिमये.सहसचिव,प्रसिद्धी प्रमुख मुकुंद फडके , ऍड सतीश खानविलकर. कायदा सल्लागार,सुधाकर कुलकर्णी सी ए स्वीकृत सदस्य
कार्यकारिणी सदस्य
डॉ अरविंद काळे,जनार्धन गायकवाड,दत्तात्रय इंगवले,अशोक थोरात,लक्ष्मीकांत वाळिंबे,पांडुरंग कुलकर्णी ,प्रकाश येळगावकर,दत्तात्रय देगावकर
फोटो ओळ
उमेद ज्येष्ठ नागरिक संघांच्या स्थापनेची माहिती देताना दिलीप चरेगावकर,शेजारी डॉ अरविंद काळे,गोपाळ खजुरे,अशोक कानेटकर,सुजाता कानेटकर

