प्रा. राहुल वाडते यांना पीएच.डी.


सातारा
कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक राहुल तुळशीराम वाडते यांना इंग्रजी विषयात शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त झाली आहे. ‘सिलेक्ट दलित ऑटोबायग्राफीज: ए स्टडी इन क्रायसिस ऑफ आयडेंटिटी’ हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. त्यांना किसनवीर महाविद्यालयातील माजी इंग्रजी विभाग प्रमुख प्रो. डॉ. सुनील सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. वाडते यांचे मुळगाव तांबवे कराड येथील असून गेल्या दहा वर्षांपासून रयत शिक्षण संस्था सातारा पाचवड, उंब्रज, कोरेगाव या शाखेत अध्यापन केले आहे. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात अकरा शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत दळवी, सहसचिव, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, ऑडीटर राजेंद्र मोरे, प्राचार्य डॉ. एल. डी. कदम, उपप्राचार्य डॉ. अनिल दडस, उपप्राचार्य संजय डांगे, डॉ. देवानंद सोनटक्के, डॉ. विजयकुमार कोष्टी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!