साताऱ्यात बुधवारी गाण्यांची सुरेल मैफिल


दीपलक्ष्मी व संगीतप्रेमी ग्रुप यांच्यातर्फे आयोजन
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व संगीतप्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे गाण्यांची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली आहे. संगीतप्रेमी ग्रुपचे संस्थापक प्रमोद लोंढे, राजेंद्र पाटील, विनय कुमार या कार्यक्रमाचे आयोजक असून यावेळी अपर्णा गायकवाड, स्नेहल चिंचणे, विनय कुमार, राजेंद्र पाटील, प्रमोद लोंढे हे कलाकार गाणी सादर करणार आहेत.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक तरुण भारतच्या सातारा आवृत्ती प्रमुख प्रगती पाटील, गीता पाटील, डॉक्टर सारिका देशपांडे, मुकुंद फडके, शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत.सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!